22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरमयत सभासदाच्या वारसास १० लाखांचा धनादेश सुपूर्द

मयत सभासदाच्या वारसास १० लाखांचा धनादेश सुपूर्द

लातूर : प्रतिनिधी

लातूर जिल्हा पोलीस अधिकारी, कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या वतीने संस्थेच्या मयत सभासदाच्या वारसांना दि. ९ मे रोजी १० लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. पतसंस्थेचे सभासद पोलीस अंमलदार ब. नं. ८६४ बब्रुवान तपघाले नेमणूक पोलीस ठाणे शिरुर आनंतपाळ यांचे मागील वर्षी रोड अपघातात जखमी होऊन निधन झाले होते. पत संस्थेच्या विद्यमान संचालक मंडळाने दि. न्यू इंडिया इन्शुरन्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड या कंपनीच्या मुख्यालयास भेटी देवुन,

त्यांच्या वरिष्ठ अधिका-यांशी सातत्याने संपर्कात राहून मयत पोलीस अंमलदार बब्रुवान तपघाले यांचा ग्रुप इन्शुरन्स क्लेम मंजूर करुन घेतला. सदर ग्रुप इन्शुरन्स क्लेमच्या १० लाख रुपये रकमेचा धनादेश मयत पोलीस अंमलदार तपघाले यांचे वारस त्यांची पत्नी यांना पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, लातूर जिल्हा पोलीस अधिकारी, कर्मचारी सहकारी पत संस्थेचे चेअरमन परमेश्वर ढेकणे, संचालक उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR