22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडामराठमोळ््या सचिनने जिंकले कांस्य पदक

मराठमोळ््या सचिनने जिंकले कांस्य पदक

पॅरालिम्पिकमध्ये भारताला मिळाले २१ वे पदक
पॅरिस : वृत्तसंस्था
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला २१ वे पदक मिळाले. आज सातव्या दिवशी महाराष्ट्राच्या सचिनने भारतासाठी गोळा फेक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. सचिन खिलारीने सातव्या दिवशी भारताचे खाते उघडले आणि पुरुषांच्या गोळा फेक स्पर्धेत पदक जिंकले. वर्ल्ड चॅम्पियन सचिनचा १६.३२ मीटरचा फेक हा एफ-४६ प्रकारातील आशियाईने केलेला आतापर्यंतचा सर्वोत्तम थ्रो होता. २०२३ आणि २०२४ चा विश्वविजेता सचिन खिलारी कॅनडाच्या ग्रेग स्टीवर्टच्या मागे राहिला. ग्रेग स्टीवर्टने १६.३८ च्या थ्रोसह सुवर्णपदक जिंकले.

या स्पर्धेत एकूण तीन भारतीय सहभागी झाले होते. मोहम्मद यासर आणि रोहित कुमार यांना यश मिळविता आले नाही. त्यांनी अनुक्रमे १४.२१ मीटर आणि १४.१० मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह ८ वे आणि ९ वे स्थान पटकावले. वर्ल्ड चॅम्पियन आणि एशियन गेम्स जिंकून पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये आलेला सचिनने सर्व ६ वैध थ्रो केले. दुस-या प्रयत्नात त्याच्या सर्वोत्तम कामगिरीसह सुरुवातीपासूनच टॉप-२ स्पर्धकांमध्ये राहिला. या स्पर्धेत भारताला ४० वर्षाआधी पदक मिळाले होते. त्यामुळे सचिनने तब्बल ४० वर्षांनंतर भारतासाठी गोळाफेक स्पर्धेत पदक जिंकले. या पदकांसह त्याने ४० वर्षापासून असलेला पदकाचा दुष्काळही संपवला.

२०१७ मध्ये पहिले सुवर्ण जिंकले
प्रशिक्षक अरविंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूने गोळाफेकमध्ये आपले कौशल्य वाढवले. त्याने २०१७ मध्ये जयपूर नॅशनलमध्ये ५८.४७ मीटर फेक करून पहिले सुवर्णपदक जिंकले. गेल्या वर्षी पॅरिसमध्ये १६.२१ मीटरच्या नवीन आशियाई विक्रमासह त्याने पहिले जागतिक पॅरा विजेतेपद जिंकले. यानंतर त्याने हांगझोऊ आशियाई पॅरा गेम्समध्ये १६.०३ मीटर फेक करून विजेतेपद पटकावले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR