लातूर : प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त येथील दयानंद कला महाविद्यालयाच्या सभागृहात दि. ३ जानेवारी रोजी मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील पर्यावरण क्षेत्रात कार्य करणा-या १२ महिलांचा सह्याद्री देवराई लातूर, दयानंद कला महाविद्यालय , द संस्कृती फाउंडेशन, बाबासाहेब परांजपे फाउंडेशन, कला मंच लातूर, हरितीवाचक चळवळ यांनी संयुक्त विद्यमाने पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी समाज कल्याण विभागाचे सह आयुक्त अविनाश देवशेटवार हे होते. तर प्रमुख पाहुणे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, बीड येथिल सामाजिक कार्यकर्त्या माजी प्राचार्य सविता शेटे, महिला आयोगाच्या माजी सदस्या आशा भिसे आणि दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य नागरगोजे, उपप्राचार्य अंजली जोशी टेंभुर्णीकर, डॉ. बी. आर. पाटील उपस्थित होते.
सत्कारात प्रामुख्याने मराठवाड्यातील अडीचशे पक्ष्यांच्या प्रजातीवर कार्य करणा-या, पक्ष्यांवर पुस्तक लिहलेल्या अंबाजोगाई येथील डॉ. शुभदा लोहिया, छत्रपती संभाजीनगर येथील मनीषा चौधरी, बीडच्या सृष्टी सोनवणे, नांदेड येथील डॉ. सुषमा. दापकेकर, उमरग्याच्या ज्योती सातपुते, डॉ. वर्षा दरडे , लातूर मनपाच्या स्वच्छता कर्मचारी लता रसाळ, पर्यावरण चळवळीला कायम सहकार्य करणा-या व लिखाण करणा-या पत्रकार शाहेदा पठाण, सीआयडी खात्यात पोलीस अधिकारी असलेल्या माधवी मस्के, बॉडी बिल्डर राज्यस्तरीय स्पर्धेत भाग घेतलेल्या स्नेहा बरडे, सप्तफेरे विवाह संस्थेच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देणा-या आणि चला सावली पेरू या उपक्रमासाठी पिशव्या उपलब्ध करून देणा-या सावित्री राजुळे या सर्वांना नारी शक्ती २०२५ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन आपण करून आपण या महिलांना बळ दिले असे सह आयुक्त अविनाश देवशेटवार म्हणाले. तर अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे म्हणाले, स्त्रीयांवरील अत्याचार नियंत्रित राहण्यासाठी आमच्या विभागातर्फे अनेक कार्यशाळा आम्ही घेत आहोत यामुळे समाजात जनजागृती होईल हा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माधव बावगे, अभिजीत लोहिया, सिद्धार्थ सोनवणे, अभय मिरजकर, श्याम जैन, रजनी वैद्य., डॉ. जाजू यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होत. प्रास्ताविक सह्याद्री देवराईचे समन्वयक सुपर्ण जगताप यांनी
केल.े