23.9 C
Latur
Saturday, September 21, 2024
Homeलातूरमराठा आरक्षणासाठी २३ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा बंद

मराठा आरक्षणासाठी २३ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा बंद

लातूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे यांच्या अंतरवाली सराटी येथे  मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ व मराठा समाजास ओबीसीतून तातडीने आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवार दि. २३ सप्टेंबर रोजी लातूर जिल्हा बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या बंदसाठी समाजबांधवांनी उत्सफूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मराठा आरक्षणासाठी समाज सातत्याने संघर्ष करीत आहे. आरक्षणाअभावी होत असलेली समाजाची परवड दिसत असताना सरकार व विरोधक हा प्रश्न गांभिर्याने  न घेता त्याचे सातत्याने राजकारण करीत आहेत. शिक्षण घेऊन नोकरी मिळत नसल्याने अनेक युवकांनी आत्महत्या केल्या आहेत व त्या सुरुच आहेत. आर्थिक हतबलतेने अनेकांना शिक्षण अर्ध्यावर सोडावे लागत आहे. या आपत्तीतून समाजाला बाहेर काढण्यासाठी व त्यांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण मिळणे हाच एकमेव पर्याय आहे.
हे आरक्षण मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण योध्दे मनोज जरांगे पाटील हे प्राणांतिक उपोषण करीत आहेत. त्यांची प्रकृती ढासळली आहे तरिही शासन हा विषय मार्गी लावण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.  विरोधकही या प्रश्नाशी आपले काहीएक देणेघेणे नाही आशा भूमिकेत आहेत याच्या निषेधार्थ, तसेच जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आरक्षणासाठी हा बंद असल्याचे समाज बांधवांच्या वतीने सांगण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR