22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeसोलापूर  मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली सुशीलकुमार शींदे यांची भेट

  मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घेतली सुशीलकुमार शींदे यांची भेट

सोलापूर: मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व आमदार आणि सर्व पक्षाचे जेष्ठ नेते यांना भेटून आगामी विशेष अधिवेशनात आमदारांनी मराठा आरक्षणावर भाष्य करून ते मंजूर करावे यासाठी स्थानिक पातळीवर आमदारांकडे पाठपुरावा करावा अशा सूचना केल्या आहेत. त्या नुसार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची जनवात्सल्य या निवास स्थानी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी मराठा समन्वयकांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

२००४ साली मी मुख्यमंत्री असताना मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे एकच आहे असा जीआर काढला होता, त्याच वेळी सग्या सोयऱ्याचा प्रश्न महाराष्ट्रातून संपला असल्याची प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली.

महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्व आमदारांना विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण मंजूर करण्यासाठी आवाज उठऊन आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी स्वतः सर्वांशी बोलावे. असे निवेदन दिल्याची माहिती काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुनील रसाळे यांनी दिली.

निवेदन देते वेळी मराठा क्रांती मोर्चा ज्येष्ठ समन्वयक दास शेळके, सुनिल रसाळे, शेखर फंड, संजय घाडगे, गणेश शिंदे, विजय साळुंखे, बाबा शेख, निरंजन नवगिरे, महादेव हिंगमिरे, संभाजीराव शितोळे, चक्रपाणी गज्जम, विनोद शिरसागर, ओंकार यादव, अनिल मस्के, दिनानाथ शेळके, महेश जाधव, यांच्यासह मराठा बांधव उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR