24.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रमराठा, दलित, मुस्लीम एकत्र आल्यास राज्यात सत्ता पालटणार

मराठा, दलित, मुस्लीम एकत्र आल्यास राज्यात सत्ता पालटणार

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा, दलित आणि मुस्लीम या तीन शक्ती एकत्र आल्यास राज्याची सत्तापालट करणे सहज शक्य आहे. हे तीनही समाज एकत्र येऊ नयेत, म्हणून सत्ताधारी मंडळी आपल्यातच झुंज लावत आहे, ही खेळी ओळखा व मनापासून एकत्र येण्याचा प्रयत्न करा, असे आवाहन मराठा आक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केले.

मिटमिट्याच्या डोंगरावर आकारास येत असलेल्या ऊर्जाभूमीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची पायाभरणी जरांगे पाटील यांच्या हस्ते रविवारी सायंकाळी झाली.
त्याप्रसंगी जरांगे पुढे म्हणाले, देवेंद्र फडणवीसचा ‘डीएनए’ ओळखणे अवघड आहे. सकाळी ते ंिहदुत्ववादी असतात, दुपारी ते बहुजवादी असतात आणि सायंकाळी ते पुरोगामी असतात. रंग बदलणा-या अशा माणसापासून सावध राहिले पाहिजे.

राज्यात मराठा, दलित आणि मुस्लीम या तीनच शक्ती निर्णायक आहेत. हे तिघेजण संघटित झाले पाहिजेत. वरवर एकत्र येऊन चालणार नाही, तर मनापासून प्रक्रिया घडली पाहिजे. मग, काहीही अशक्य नाही. लक्षात ठेवा, एकटा कोणताही समाज स्वत:च्या ताकदीवर सत्ता स्थापन करू शकत नाही. त्यासाठी या तीन शक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे. मात्र, दुर्दैव असे की, सत्ताधारी मंडळी या तिघांंना एकत्र येऊ देत नाही. त्यांच्यात सतत भांडणे लावून एकमेकांपासून दूर लोटण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे आपण ओळखले पाहिजे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR