22.3 C
Latur
Sunday, September 29, 2024
Homeसोलापूरमराठा सेवा संघाच्या वतीने निर्मलकुमार फडकुले सभागृहात वधू- वर मेळावा

मराठा सेवा संघाच्या वतीने निर्मलकुमार फडकुले सभागृहात वधू- वर मेळावा

सोलापूर : मराठा समाज बांधवांनी आपल्या मुला-मुलींचे विवाह जमविताना संपत्ती-मालमत्ता यांचे मूल्यांकन करू नये. मुला-मुलींचे कर्तृत्व पाहावे, असे आवाहन विविध मान्यवरांनी केले.
मराठा सेवा संघाच्या वतीने निर्मलकुमार फडकुले सभागृहात वधू- वर मेळावा झाला. अध्यक्षस्थानी सेवा संघाचे विभागीय अध्यक्ष प्रशांत पाटील होते.

मंचावर सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पवार, कार्यकारी अभियंता सदाशिव शेळके, मराठा पतसंस्थेचे चेअरमन अमोल शिंदे, नाना काळे, दत्तात्रय मुळे, तुळजापूरचे उपनिबंधक दत्तात्रय मोरे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सोमनाथ राऊत, अ‍ॅड. बाबासाहेब जाधव, प्रा. गणेश देशमुख, रवी मोहिते, महादेव गवळी, जिजाऊ ब्रिगेडच्या उज्ज्वला साळुंखे आदी उपस्थित होते. विवाह जमविताना दूध-वरांसाठी काही अवास्तव अटी घातल्या जातात.त्यातून विवाह जमविताना अडचणी येतात. समाज बांधवांनी विवाह सोहळाकरताना कोणताही डामडौल, थाटमाट न करता साधेपणाने विवाह सोहळा साजरे करण्याची प्रथा मराठा समाजाने सुरू करावी, असा सूर प्रमुख मान्यवरांनी आपल्या भाषणातून काढला.

सदाशिव पवार यांनी वधू-वर मेळावा घेण्यामागची भूमिका विशद केली. या मेळाव्याला ५०० हून अधिक वधू-वर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मनाली जाधव, श्रद्धा माने, नागनाथ पवार, दीपाली माने, सानिका पवार, प्रकाश ननवरे, आर. पी. पाटील, अंबादास सपकाळे, राम माने, दीपक शेळके, परशुराम पवार, नवनाथ कदम, डॉ. संजीवनी मुळे यांनी परिश्रम घेतले.समाज बांधवांनी विवाहासाठी भरमसाठ खर्च करण्याऐवजी भविष्याचे आर्थिक नियोजन करावे. समाजात बहुसंख्य शेतकरी, कामगार आहेत. या समाजात आत अर्थ साक्षरता महत्त्वाची आहे. त्यादृष्टीने आगामी काळात जनजागृती करण्यात येईल, असे प्रशांत पाटील यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR