27.8 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रमराठीच्या अभिजात भाषेची फक्त घोषणा

मराठीच्या अभिजात भाषेची फक्त घोषणा

अंमलबजावणी कधी?, निधीवरूनही संभ्रम कायम
मुंबई : प्रतिनिधी
मराठीला अभिजात भाषेच्या दर्जा देण्याची नुसतीच घोषणा झाली असून केंद्राकडून अभिजाततेचा अजून अधिकृत दर्जा दिला नसल्याची माहिती समोर आली आहे. मराठी व्यापक हित चळवळीचे डॉ. श्रीपाद जोशी यांनी ही माहिती दिली. मराठीच्या कामांसाठी केंद्र सरकार किती निधी देणार, हेदेखील अस्पष्ट असल्याचे श्रीपाद जोशी यांनी सांगितले. तसेच मराठीच्या उच्च दर्जाच्या संशोधन केंद्राच्या निधीवरूनही संभ्रमच असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचे अधिकृत पत्र अथवा शासन निर्णय अद्याप काढण्यात आला नसल्याची माहिती समोर आली. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्री आणि सचिवांशी यासंबंधी पत्रव्यवहार करून विचारणा केली. पण केंद्राकडून त्याला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही, अशी माहिती श्रीपाद जोशी यांनी दिली. डॉ. श्रीपाद जोशींनी केंद्राला तीन पत्रे पाठवली आहेत. मराठी भाषेला ३ ऑक्टोबर २०२४ रोजी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. केंद्राने तशी घोषणा केली. मात्र, तीन महिने लोटले तरी अजून यासंदर्भात् अधिकृत पत्र किंवा शासन निर्णयसुद्धा निघालेला नाही.

राजकीय जुमला होता का? : राऊत
यावरुन ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा राजकीय जुमला होता का, घोषणा करूनही अद्याप मराठी भाषेचा जीआर का काढला नाही, असा सवाल उपस्थित केला.

सर्व प्रक्रिया पूर्ण : मुख्यमंत्री
अभिजात मराठीच्या सगळ््या चर्चांवर थेट मुख्यमंत्र्यांनीच उत्तर दिले. अनेक वेळा अनेक लोक योग्य माहिती न घेता बोलत असतात. त्यात सगळ््या प्रकारच्या प्रक्रिया असतात. त्या प्रक्रिया आपण पूर्ण केल्या आहेत. केंद्राने आपल्याला अभिजात दर्जा दिलेला आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR