Homeमनोरंजनमराठी कलाकारांनी घेतला मनसेत प्रवेश

मराठी कलाकारांनी घेतला मनसेत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २० वा वर्धापन दिन ९मार्चला उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मनसेप्रमुख राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच राज्यभरात सदस्य नोंदणीची मोहीम राबवण्याची सूचना केली. त्यानंतर अनेक मराठी कलाकारांनी मनसेत प्रवेश केला. मराठी मनोरंजनसृष्टीतील तीन मोठ्या कलाकारांनी मनसेचे सभासदत्व स्वीकारले आहे.

प्रसिद्ध अभिनेता भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, तसेच दिग्गज दिग्दर्शक केदार शिंदे यांनी राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्यत्वाची नोंदणी केली. यावेळी या तिघांसोबत भरत दाभोळकर देखील होते. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे.

मराठी कलाकार कायम राज ठाकरे यांना आणि मनसेला पाठिंबा देताना दिसतात. तसेच राज ठाकरे स्वत: कलाकारांना मदत करायला पुढे असतात. १९ मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज ठाकरे सभा घेणार आहे. या सभेकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, केदार शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी फॉर्म्सवर सह्या केल्या. भरत जाधव, पुष्कर श्रोत्री, केदार शिंदे ही मराठी मनोरंजन इंडस्ट्रीतील खूप मोठी नावे आहेत. अलिकडेच केदार शिंदे दिग्दर्शित ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणताय सासूबाई?’चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. तर भरत जाधव ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR