19.4 C
Latur
Friday, January 10, 2025
Homeनांदेडमराठ्यांच्या निर्णयाने निवडणूक आयोगा समोर आव्हान?

मराठ्यांच्या निर्णयाने निवडणूक आयोगा समोर आव्हान?

एका बॅलटपेपरवर १४ उमेदवार एकूण ६० उमेदवारांमध्ये लढत शक्य

नांदेड : विशेष प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मतदारसंघातील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव (महादेव) ग्रामपंचायतीने गावातील १० मराठा युवकांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा ठराव मंजूर केला. त्यानंतर अर्धापूर तालुक्यात २५० मराठा युवकांना निवडणूक रिंगणात उभे करण्याचे ठरल्यामुळे आता निवडणूक आयोगाची चांगलीच पंचाईत होणार आहे. एका बॅलट युनिटवर जास्तीत जास्त १४ उमेदवारांची मतपत्रिका बसविली जाते. त्यानुसार एकावेळेला जास्तीत जास्त चार बॅलेट युनिटचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे केवळ ६० उमेदवारांची मतपत्रिका सेट होऊ शकते. त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर निवडणूक घेणे निवडणूक आयोगासमोर आव्हान राहणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे व मराठा नेते दीपक पाटील या दोन्ही नेत्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतले असल्याचे कळते. यामध्ये मनोज जरांगे यांनी अद्याप निर्णय घेतला नसला तरी त्यांना ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक ंिरगणात उतरण्याचे आवाहन केले आहे. निवडणूक लढूनच लोकसभेत आरक्षणाचा प्रश्न मांडून निकाली काढता येतो, असेही त्यांनी सांगितले. तर दुसरे मराठा नेते विनोद पाटील यांनी तर छत्रपती संभाजीनगरातून अपक्ष लोकसभा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. कुठल्या पक्षाने निमंत्रित केल्यास निश्चितच विचार करून त्या पक्षातर्फे निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे दर्शविले. यामुळे दोन्ही नेते राजकारणात येतील, अशी अपेक्षा बाळगली जात असतानाच नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील ंिपपळगाव (महादेव) या ग्रामपंचायतीने गावागावातून उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शविल्याने जवळपास २५० युवकांना निवडणुकीच्या ंिरगणात उतरविण्याचा निर्धार केला आहे. अशा राजकीय कृतीने राज्य सरकारविरूद्ध असंतोष व्यक्त केला जाणार आहे.

यापूर्वी परभणी जिल्ह्यातील ग्रामपंचायत चाटे पिंपळगाव ता.पाथरी मधील पोटनिवडणुकीमध्ये असाच प्रकार घडला होता. त्यामध्ये एका जागेसाठी १५५ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची तयारी करण्यात आली होती. परंतु निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमुर्ती यांनी परभणी जिल्हाधिका-यांना पत्र लिहून अगदी स्पष्टपणे कळविले की, आयोगाच्या २८ मार्च २००७च्या आदेशानुसार ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये इलेक्ट्रॉनिक यंत्राचा वापर करण्यात येत आहे. एका बॅलट युनिटवर जास्तीत जास्त १४ उमेदवाराची मतपत्रिका बसविली जाते. त्यानुसार एकावेळेला जास्तीत जास्त ४ बॅलट युनिटचा वापर केला जाऊ शकतो. त्यामुळे एकूण ६० उमेदवारांची मतपत्रिका सेट होऊ शकतो. सबब एका जागेसाठी १५५ उमेदवारांची संख्या लक्षात घेता ग्रामपंचायत चाटे ंिपपळगाव ता. पाथरी जि. परभणी मध्ये इलेक्ट्रॉनिक मतयंत्राद्वारे निवडणूक घेता येणार नाही. पोटनिवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने राबविण्यासाठी पुरेशा प्रमाणात व मो्या मतपेट्या उपलब्ध नसल्याने पोटनिवडणुकीची प्रक्रिया तूर्त राबविता येणार नाही, असा आदेश दिल्यामुळे त्यावेळी त्या गावातील निवडणूक थांबविण्यात आली होती. असाच काहीसा प्रकार मराठा समाजाकडून पूर्ण राज्यात घडल्यास निवडणूक आयोगासमोर लोकसभा निवडणूक आव्हानात्मक राहणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR