23.2 C
Latur
Wednesday, December 4, 2024
Homeनांदेडकुंटनखान्यावर धाड, ७ महिलांसह १० पुरूषांना पकडले

कुंटनखान्यावर धाड, ७ महिलांसह १० पुरूषांना पकडले

सहायक पोलिस अधीक्षकांच्या पथकाची कारवाई

नांदेड : प्रतिनिधी
मालेगाव रस्त्यालगत असलेल्या एका पॉश परिसरातील लॉजवर चालणा-या कुंटनखान्यावर थेट सहायक पोलिस अधीक्षकांसह पथकाने गुरूवारी सायंकाळी धाड टाकली. या कारवाई ७ महिलांसह १० पुरूषांना पकडण्यात आले.

शहरालगत असलेल्या मालेगाव रस्तालगतच्या परिसरात कुंटनखाना चालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. याची दखल घेत थेट सहायक पोलिस अधीक्षक किर्तीका यांनी आपल्या पथकासह सापळा रचून एका बिअर बारच्या पाठीमागे गुरूवारी सायंकाळी वागदरा लॉजमधील कुंटनखान्यावर धाड टाकली.

पॉश परिसरातील इमारतीत चालणा-या या कुंटनखान्यात ७ महिलांसह १० पुरूषांना पकडण्यात आले. शहरात अनेक महिन्यानंतर झालेल्या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईत पोनि शेंडगे, पीएसआय लोणेकर यांच्यासह कर्मचा-यांनी सहभाग घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR