30.1 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeमहाराष्ट्रमला अमितचा मोठा विजय हवाय : शर्मिला ठाकरे

मला अमितचा मोठा विजय हवाय : शर्मिला ठाकरे

 माहीम : प्रतिनिधी
 यंदाच्या विधानसभा निवडणुकीत माहीममध्ये बिग फाईट आहे. सदा सरवणकर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. अमित पहिल्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहे. तो लढतो आहे. तो निवडून येईल याची १०० टक्के खात्री आहे. अमित ठाकरे यांच्याविरोधातल्या उमेदवारांना आम्ही अर्ज मागे घ्या असेही म्हटले नाही. उलट ते शेवटच्या दिवशी भेटायला आले तर आम्ही ते ही टाळलं, असं मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पत्नी व अमित ठाकरे यांच्या मातोश्री शर्मिला ठाकरे यांनी सांगितले.
दरम्यान, माहीम विधानसभा मतदारसंघाची संपूर्ण राज्यात चर्चा आहे. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे माहीममधून निवडणूक रिंगणात आहेत. अमित ठाकरेंसमोर तीन वेळचे आमदार सदा सरवणकर आणि उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांचे आव्हान आहे.
   पुढे बोलताना ठाकरे म्हणाल्या, दुस-या पक्षातल्या लोकांना आपल्या पक्षात घेऊन आरशासमोर उभे राहून मागच्या निवडणुकीत वरळीत निवडणूक लढण्यात आली होती, तशी आम्ही निवडणूक लढवत नाही. मला अमितचा अभिमान आहे की तो स्वत: मैदानात उतरून या गोष्टी करतो आहे. तो निवडून येईल याची १०० टक्के खात्री आहे. मला अमितचा मोठा विजय हवाय छोटा विजय नकोय’ असे शर्मिला ठाकरे म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR