सिंधुदुर्ग : मंत्री नितेश राणे यांनी पुन्हा निधीवाटपावरून ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडीतील सरपंचांना दम भरला आहे. तुम्हाला एक रुपयाचा विकास निधी मिळणार नाही. चला गाडीत बसा, भाजपचे पट्टे गळ्यात घालून घ्या आणि विषय संपवा, असे विधान नितेश राणे यांनी केले आहे. आपण दबाव टाकतो, दबाव घेत नाही. सगळा विषय क्लिअर आहे, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.
नितेश राणे म्हणाले, एप्रिल महिन्यात नवीन आर्थिक वर्षात पहिल्या आठवड्यात सरपंचांची यादी घेऊन बसणार आहे. भाजप १०० टक्के, उबाठा शून्य टक्के निधी…. बोंबलत बसा.. आपल्याला काहीही फरक पडत नाही.
संधीचे सोने करा, बोंबलत बसू नका
भाजप वाढला पाहिजे, ही आपली भूमिका आहे. संधीचे सोने करा, बोंबलत बसू नका. आता तुमची सत्ता आली आहे. समिती, पदांवर भाजपच्या कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल, असे नितेश राणे यांनी सांगितले.