मथुरा : मथुरेच्या शाही ईदगाह मशिदीत तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचा-यांना एका तरुणाने बॉम्बने मशीद उडवून देण्याची धमकी दिल्याने त्यांना घाम फुटला. यानंतर तरुणाने धावत जाऊन कारमध्ये बसून स्वत:वरपेट्रोल ओतून घेतले. हे पाहून पोलिसांनी गाडीची काच फोडून त्याला बाहेर काढले आणि त्याला अटक करून पोलिस ठाण्यात नेले.
ही घटना एकच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे, शाही ईदगाहच्या गेटवर सुरक्षा कर्मचारी सतर्क उभे असताना एक तरुण तेथे आला आणि त्याने शाही ईदगाह बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. यानंतर तो पटकन गाडीत बसला आणि दरवाजा आतून बंद केला. यानंतर त्याने स्वत:वर पेट्रोल ओतून घेतले. हे पाहून सुरक्षा कर्मचा-यांनाही आश्चर्य वाटले. सुरक्षा कर्मचा-यांनी तात्काळ गाडीची काच फोडून तरुणाला बाहेर काढले. चौकशीत आरोपीने आपले नाव पुष्पेंद्र असून तो जमुनापार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मीरा विहार कॉलनी येथील रहिवासी आहे. माहिती मिळताच त्यांच्या कुटुंबीयांनीही पोलिस ठाणे गाठले.