16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरमसलगा प्रकल्पाच्या पाळूवर भेग; नागरिकांत भितीचे वातावरण

मसलगा प्रकल्पाच्या पाळूवर भेग; नागरिकांत भितीचे वातावरण

निलंगा : वार्ताहर
तालुक्यातील निटूरपासून जवळच आसलेल्या मसलगा मध्यम प्रकल्पाची पाळू भेगाळली असून नागरिक भयभीत झाल्याने तातडीने सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. मसलगा मध्यम प्रकल्पाच्या पाळूवर जवळपास दिडशे फुटांची भेग पडल्याने तलाब फुटेल या भितीने परिसरातील गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून खबरदारी म्हणून प्रशासनाने शुक्रवारी सहा तर दरवाजे १० सेंटीमीटरने तर रविवारी २ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

मागील कांही दिवसांपासून मसलगा मध्यम प्रकल्पाच्या कारभाराचे ंिधडवडे उडत असून आठ दिवसांपूर्वी तलाव १०० टक्के भरुन धोक्याची पातळी ओलांडत असतानाचे फोटो एका शेतक-याने समाज माध्यमातून व्हायरल केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रकल्प प्रशासनाने सहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पाळूला भेग पडल्याचे येथील शेतकरी तुळशीदास साळुंके यांच्या निदर्शनास आले. चार दिवसांपूर्वी दिवशी भेगेची रुंदी चार इंच इथपर्यंत होती. मात्र तीच भेग शुक्रवार (दि६) रोजी पाहिली असता चार इंचावरुन दहा इंचापर्यंत वाढल्याने घाबरून गेलेल्या शेतकरी साळुके यांनी याच ठिकाणी उभारुण व्हिडिओ करीत चार दिवसात एवढी मोठी भेग वाढत जात असताना प्रकल्प प्रशासन झोपा काढत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सदरील वृत्त वा-यासारखे गावात पसरताच तलाव फुटेल या भीतीने ग्रामस्थांनी तलावाकडे धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रकल्पाचे अधिक्षक अभियंता अमरंिसह पाटील, कार्यकारी अभियंता पवार, उपअभियंता जोजारे यांनी पाहणी करून तातडीने पाणीसाठा कमी करण्याचा निर्णय घेऊन प्रकल्पाचे सहा दरवाजे १० सेंटीमीटरने उघडून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR