17.5 C
Latur
Saturday, January 18, 2025
Homeलातूरमसलगा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

मसलगा मध्यम प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग

निटूर : वार्ताहर
निटूर लगतच आसलेला मसलगा मध्यम प्रकल्पाचे दोन गेट उघडून पाणी सोडण्यात आले आहे.  मसलगा मध्यम प्रकल्पात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच प्रकल्पात मुबलक साठा आल्याने भविष्यात या पाण्यामुळे खालील पिकांना शेतक-याांंना बाधा होऊ नये म्हणून लघु पाटबंधारे विभागाने सतर्कता दाखवत ८ ऑगस्ट रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास दोन गेट दहा सेंटिमीटरने उघडून १६ क्यूसेस  पाण्याचा विसर्ग सोळ नाल्याद्वारे मांजरा नदी पात्रात करण्यात आला तर ९ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता एक गेट बंद करण्यात आले होते. विसर्ग ९ ऑगस्ट रोजी सकाळी दहापर्यंत दोन्हीही गेट बंद करून पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.
मसलगा प्रकल्पात ७७ टक्के पाणीसाठा सध्या प्रकल्पात ७७ टक्के पाणीसाठा असून पावसाळा आणखीन लांब आहे.   सप्टेंबर पर्यंत हे धरण १०० टक्के भरेल परंतु भविष्यातील धोका लक्षात घेऊन दोन गेटमधून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती मसलगा मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता जोजारे यांनी ही माहिती बोलताना दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR