अकोला : प्रतिनिधी
महाकुंभातील चेंगराचेंगरीच्या घटनेबद्दल सोशल मीडियावर प्रकाश आंबेडकर यांनी लिहिले आहे, त्यात त्यांनी म्हटले आहे की, महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या मोठी आहे. परंतु उत्तर प्रदेश प्रशासनाने ही संख्या खोटी सांगितली आहे.
महाकुंभातील मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या मोठी असून मृतदेहांवर अन्त्यसंस्कार झाले नाहीत, असा प्रकाश आंबेडकर यांचा आरोप आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी महाकुंभात चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या लपविण्यात आली आहे. महाकुंभात प्रत्यक्षात १००० पेक्षा जास्त भविकांचा मृत्यू झाला आहे.
महाकुंभात आलेल्या काही मृत भाविकांची वाहने अजूनही पार्किंगमध्ये पडून आहेत. योगी आदित्यनाथ आणि त्यांचे प्रशासन ही वाहने लपवायला विसरले असतील, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी सोशल मीडिया साईट एक्सवर ट्विट केले आहे.
मृतदेहांवर अन्त्यसंस्कार भट्टीत
महाकुंभातील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्या भाविकांची संख्या मोठी आहे. परंतु उत्तर प्रदेश प्रशासनाने ही संख्या खोटी सांगितली आहे. योगी आदित्यनाथ यांनी केलेले हे सर्वांत मोठे कव्हर-अप आहे. मृत भाविकांची संख्या लपविण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी भाविकांचा मृतदेह हिंदू रीतीरिवाजाप्रमाणे अन्त्यसंस्कार न करता भट्टीत दहन केले आहे.