लातूर : प्रतिनिधी
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त माजी वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री, लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद आमदार अमित विलासराव देशमुख यांनी गुरुवार दि. २ ऑक्टोबर रोजी लातूर शहरातील महात्मा गांधी चौक येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी खासदार डॉ. शिवाजी काळगे, लातूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय साळुंके, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव समद पटेल, ट्वेंटीवन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, माजी उपमहापौर कैलास कांबळे, लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, सीए. प्रकाश कासट, इम्रान सय्यद, व्यंकटेश पुरी, अमित जाधव, सुरेश चव्हाण, राम स्वामी, धोंडीराम यादव, आसिफ बागवान, देविदास बोरुळे पाटील, यशपाल कांबळे, सुलेखा कारेपूरकर, राज क्षिरसागर, अंगद गायकवाड, फारूक शेख, बिभीषण सांगवीकर, मोहन सुरवसे, राजू गवळी, प्रवीण सूर्यवंशी, रमेश सूर्यवंशी, गोपाळ बुरबुरे, विष्णुदास धायगुडे, अंगद गायकवाड, राम स्वामी, विजय टाकेकर, अब्दुल्ला शेख, करीम तांबोळी, अभिमान भोळे आदिसह काँग्रेस पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.