18.7 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रमहादेव जानकर स्वबळावर लढणार

महादेव जानकर स्वबळावर लढणार

मुंबई : जानकर म्हणतात, भाजप आणि काँग्रेसमध्ये काहीही फरक नाही. २०२५ मध्ये दिल्ली, बिहारच्या विधानसभा निवडणुकींसह महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे. यातच राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी मोठी घोषणा केली आहे. राष्ट्रीय समाज पक्ष मुंबई महापालिका निवडणुकांसह दिल्ली आणि बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे. अशी घोषणा करताच जानकर यांनी पुढील ‘प्लॅन’ची माहिती दिली आहे.

मुंबई आमची आहे, अशी नेहमी ज्यांची मक्तेदारी राहिलेली आहे, त्यांना आम्ही धडा शिकवू. मुंबईत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. तसेच, दिल्ली आणि बिहारची निवडणूकही आम्ही स्वबळावर लढू, असे महादेव जानकर यांनी म्हटले आहे. ते प्रसारमाध्यांशी संवाद साधत होते.
महादेव जानकर म्हणाले, मुंबई आमची आहे, अशी नेहमी ज्यांची मक्तेदारी राहिलेली आहे, त्यांना आम्ही यावेळेस धडा शिकवू. मुंबई आम्ही स्वबळावर लढवणार आहोत. तसेच, उमेदवारही निवडून आणू. यात कोणतीही शंका नाही.

दिल्लीच्या निवडणुका आहेत, त्या सर्व जागा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही आमची भूमिका नाही तर ‘वन नेशन, वन एज्युकेशन’ अशी आमची भूमिका आहे. देशातील सर्वच मुलांना एकाच शिक्षण पद्धतीने शिकवले गेले पाहिजे, हाच मुद्दा आमचा दिल्लीच्या निवडणुकीत राहील. भाजपसोबत आम्ही जाणार नाही. बिहारची निवडणूक ही स्वबळावर लढणार आहोत, असे जानकर यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR