20.2 C
Latur
Thursday, January 9, 2025
Homeलातूरमहापालिकेची वंडर वर्ल्डवर अनाधिकृत कारवाई

महापालिकेची वंडर वर्ल्डवर अनाधिकृत कारवाई

लातूर : प्रतिनिधी

शहरातील लोकनेते विलासराव देशमुख पार्कमधील (नाना-नानी पार्क) वंडर वर्ल्डचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तसेच या संबंधी कोणतेही आदेश नसताना लातूर शहर महानगरपालिकेने वंडर वर्ल्डवर कारवाई केली आहे. ही कारवाई अनाधिकृत असून न्यायालयाने यावर तात्पुरती स्थगिती दिली असल्याची माहिती वंडर वर्ल्डच्या संचालिका सोनाली उमेश ब्रिजवासी यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत दिली.

सोनाली ब्रिजवासी यांनी लोकनेते विलासराव देशमुख पार्कमधील जागा ई-टेंडरने लातूर शहर महानगरपालिकेकडून ९ वर्षांकरीता करार करुन वंडर वर्ल्ड या नावाने व्यवसाय सुरु केलेला आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने कसलाही आदेश नसताना अकस्मितरित्या वंडर वर्ल्डवर कारवाई केली. त्यावेळी सोनाली ब्रिजवासी या स्वत: जेसीबीसमोर उभ्या राहिल्या. तरीही मनपाचे कर्मचारी थांबले नाहीत. त्यांनी तेथील सीसीटीव्ही कॅमेरे, डी. व्ही. आर., तिकीट कॅश काऊंटरमधील सामाना उचलून नेले. प्रकरण न्याय प्रविष्ठ असताना आणि कसलीही परवानगी नसताना मनपाने ही अनाधिकृत कारवाई केली आहे.

त्याविरोधात तत्काळ न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिल्याने मनपाचे कर्मचारी पुढील कारवाई न करता निघून गेले. व्यवसाय उभा करण्याकरीता सोनाली ब्रिजवासी यांनी स्वत:चे घर विकले. तसेच दीड कोटी रुपये बँकेचे कर्ज घेतलेले आहेत. वंडर वर्ल्डच्या व्यवसायातूनच बँकेच्या कर्जाचे हप्ते भरीत आहेत. परंतू, महानगरपालिकेसह काही ठरावीक लोक सतत त्रास देत असून त्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्याचेही सोनाली ब्रिजवासी म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR