27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeलातूरमहायुतीचे सरकार लुटारुची टोळी 

महायुतीचे सरकार लुटारुची टोळी 

लातूर : प्रतिनिधी 
राज्यात महिला असुरक्षित आहेत, १५ हजार मुली, महिला बेपत्ता आहेत आणि मतासाठी नवीन योजना आणून दिशाभूल करत आहेत. महिलांना १५०० देऊन ३ हजाराचा खिसा कापतील, अशा सरकारपासून सावध रहा. काँग्रेस आघाडीचे सरकार असताना महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात आघाडीवर होता. पण महायुती सरकारच्या काळात आता महाराष्ट्र मागे पडला असून गुजरात पुढे गेला आहे. राज्यातील महायुती सरकार ही लुटारांची टोळी आहे. भ्रष्टाचा-यांच्या हातात सरकारच्या तिजोरीच्या चाव्या आहेत. तिजोरी साफ करणारे हे सरकार घालवा आणि काँग्रेसचा तिरंगा विधानसभेवर फडकवा, असे आवाहन विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले.
लोकसभेच्या यशानंतर काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. या अनुषंगाने पक्षाच्या वतीने विभागवार आढावा बैठका घेऊन २० ऑगस्ट रोजी मुंबई येथे विधानसभा निवडणुक प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यातील पहिली विभागीय आढाव बैठक दि. १० ऑगस्ट रोजी  लातूर येथे झाली. बैठकीदरम्यान येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर लातूर, धाराशिव, बीड या तीन जिल्ह्यांच्या झालेल्या विजय संकल्प मेळाव्यात विजय वडेट्टीवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री दिलीपराव देशमूख होते. या मेळाव्यास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस पक्षाचे विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी आमदार अ‍ॅड. त्र्यंबक भिसे, युवक काँग्रेसचे कुणाल राऊत, नानाभाऊ गावंडे, डॉ. वजाहत मिर्झा, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, माजी महापौर अ‍ॅड. दीपक सुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात लातूरचे नूतन खासदार डॉ. शिवाजी काळगे, नांदेडचे खासदार वसंतराव चव्हाण, जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
प्रारंभी शंखनाद करुन कार्यक्र्रमाची सुरुवात झाली. पाहूण्यांचे स्वागत माजी मंत्री आमदार अमित देशमुख, आमदार धिरज देशमुख, श्रीशैल उटगे, अ‍ॅड. किरण जाधव, अशोक पाटील निलंगेकर, अभय साळूुंके, गोरोबा लोखंडे, शीलाताई पाटील, स्मिता खानापूरे, अ‍ॅड. प्रमोद जाधव, कल्याण पाटील, सिराज जहागीरदार, अ‍ॅड. फारुक शेख, दीपक सुळ, एकनाथ पाटील, अनिल चव्हाण, अकबर माडजे, इम्रान सय्यद, प्रविण कांबळे, प्रविण बिरादार यांनी केलीे. कार्यक्रमास विद्या पाटील, अमर खानापूरे, संभाजी सुळ, प्रिती भोसले, उषा कांबळे, बाबासाहेब गायकवाड, दीपक राठोड आदीसह काँगेस पक्षाचे लातूर, धाराशीव, बीड येथील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचालन सुपर्ण जगताप, व्यंकटेश पुरी, प्रविण सूर्यवंशी यांनी केले. श्रीशैल उटगे यांनी आभार मानले.
राज्यात ‘मविआ’ची सत्ता आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही 
राज्यात महायुतीच्या सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे खुप मोठे नुकसान झाले आहे. महायुतीच्या सत्ताधा-यांनी महाराष्ट्र लुटून खालला आहे. आता यांचे दिवस भरले आहेत. त्यामुळे राज्यात महाआघाडीची सत्ता आणल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असे नमुद करुन सतेज पाटील पुढे म्हणाले, लोकसभेत १०० टक्के रिझल्ट देणारे माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी अता आमदार निवडून आणण्याची जबाबदारी घ्यावी. ज्या भुमिने विलासराव देशमुख यांना राज्यभर फिरण्याची मुभा दिली तशी मुभा अमित देशमुख यांना लातूरच्या मतदारांनी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
महायुती सरकारला बहीण नव्हे तर सत्ता लाडकी
यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, लोकसभेने महाराष्ट्रात काँग्रेसचा झंजावात निर्माण केला. विधानसभेच्या निवडणुकीतही काँग्रेसला मोठे यश मिळावे. लोकसभेच्या निवडणुकीत मराठवाड्यातील काँग्रेस पक्षाने १०० टक्के यश मिळवले. त्यामुळे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्यावर आता फक्त लातूर जिल्ह्याची नव्हे तर संपूर्ण मराठवाड्याची जबाबदारी आहे. राज्यातही त्यांना जावे लागेल. ते पुढे म्हणाले, भाजपाला सत्तेचा अहंकार होता. लोकसभेच्या निवडणुकीत जनतेने त्यांचा अहंकार उतरवला. राज्यातील महायुतीचे सरकार भ्रष्टाचा-यांचे आहे. बहीण लाडकी नाही तर सत्ता लाडकी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून निराधारांच्या पगारी झालेल्या नाहीत. अनेक अनुदाने रखडली आहेत. निधी अभावी अनेक विकास योजना थांबल्या आहेत. राज्याची विकास प्रक्रिया थांबली आहे. असे असताना केवळ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे गुणगाण चालले आहे.विकासरत्न विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देताना बाळासाहेब थोरात म्हणाले, काँग्रेस पक्षाचे नेते विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या कायम प्रेरणा मिळते. विलासरावजी आज आपल्यात नाहीत. परंतू, त्यांची आजवरची भाषणे काँग्रेसचा प्रचार करीत आहेत. दिलीपरावजी देशमुख यांच्या नेतृत्चाखाली अमित देशमुख व धिरज देशमुख यांनी लोकसभेत पक्षाला मोठे यश मिळवून दिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR