23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीच्या सर्वेक्षणात वाढली शिंदेंची ताकद

महायुतीच्या सर्वेक्षणात वाढली शिंदेंची ताकद

फडणवीस,अजितदादांची वाढली धाकधूक

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकीसाठी महायुतीकडून कोणी नेतृत्व करावे, यासाठी नेते चाचपणी करत आहेत. जागावाटपासाठी सर्वेक्षण झाल्याचेही समजते. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची पीछेहाट होत असल्याचे समोर आले आहे. तर या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद दिसली आहे.
नागपूर येथील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी शनिवारी महायुतीच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीने केलेल्या सर्वेक्षणाची माहिती संबंधित कंपन्यांनी सादर केली. यावेळी युतीतील तिन्ही पक्षांतील जागावाटपासंदर्भात चर्चा करण्यात आल्याचे समजते. या बैठकीला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते.

महायुतीने विविध कंपन्यांकडून निवडणुकीसाठी सर्वेक्षण केले आहे. निवडणुकीची रणनीती कशी असावी, महायुतीतील कोणत्या चेह-याला पुढे आणावे याचा गांभीर्याने विचार सुरू आहे. या सर्वेक्षणामध्ये भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तुलनेने मागे असल्याची माहिती मिळत आहे. तसेच महायुतीकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणात शिंदे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे आल्याचे समजते. या बैठकीत महाराष्ट्रातील विभागनिहाय रणनीती कशी आखायला हवी तसेच महाविकास आघाडीसोबत दोन हात करताना कशी खेळी खेळणे अपेक्षित आहे, जागावाटप कसे असावे, अशा विषयांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपामध्ये अधिक भक्कमपणे भूमिका घेता येणार आहे. अजित पवार गटानेही आतापासूनच जागांवर दावा सुरू केला असला, तरी पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष अद्याप पाहिजे तेवढा मजबूत झालेला नाही. विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका वेगवेगळ्या मुद्यांवर लढवल्या जातात. लोकसभा निवडणुकीचे मुद्दे यावेळी राज्याच्या निवडणुकीत उपयोगी पडणार नाहीत. मोदी करिश्माही उपयोगाला येणार नाही. त्यामुळे महायुतीला अचूक रणनीती आखावी लागणार आहे. राज्यात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जोरदार प्रचार सुरू आहे. या योजनेला चांगला प्रतिसादही मिळत आहे. पण या योजनेला मिळणा-या प्रतिसादाचे मतदानात रूपांतर होणार की नाही याबद्दल साशंकता आहे. महायुतीला विजयापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक गणितांचा अभ्यास करून निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागणार आहे हे नक्की.

लोकसभेच्या निकालांचा परिणाम
लोकसभेच्या निकालांचा परिणाम विधानसभा निवडणुकीमध्ये दिसण्याची शक्यता कमी असते. विधानसभा निवडणुकीत त्या वेळेचे स्थानिक घटक अधिक आणि स्थानिक विषय महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चेहरा भाजप आणि राष्ट्रवादीच्या तुलनेत शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी ब-यापैकी चालत असल्याची चर्चा आहे. खरंच शिंदेंना पुढे केल्याने अपेक्षित असा परिणाम येणार आहे का? हवा तो रिझल्ट मिळणार आहे का याचेही चिंतन या बैठकीत करण्यात आले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR