32.6 C
Latur
Monday, March 17, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीत पुन्हा नाराजी?

महायुतीत पुन्हा नाराजी?

अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील: राष्ट्रवादी नेत्याच्या दाव्यानं खळबळ

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री पदासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. येत्या काळात अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, हे त्यांचे वैयक्तिक मत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

पक्षप्रमुख अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता असून भविष्यात तेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे मत बाबासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना व्यक्त केले. पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील चांगलं काम करतायत. परंतु, भविष्यात निवडणुकीनंतर अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, हे फक्त माझे वैयक्तिक मत आहे. माझा कोणालाही विरोध करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

सध्या महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. ज्यामध्ये भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा समावेश आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपानं १३२, शिवसेनने ५७ तर राष्ट्रवादीने ४१ जागा जिंकल्या होत्या. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार हे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी रणनीती आखण्यात व्यस्त आहेत.

विधान परिषदेच्या ५ जागांसाठी २७ मार्च रोजी मतदान होणार आहे. त्यापैकी एक जागा महायुतीच्या वाट्याला आली आहे. या जागेसाठी पक्षाच्या अनेक नेत्यांनी इच्छा व्यक्त केली आहे, परंतु सध्या ३ प्रमुख नावे या शर्यतीत आघाडीवर आहेत. या नावांमध्ये झिशान सिद्दीकी, उमेश पाटील संजय खोडके यांचा समावेश होता. यात संजय खोडके यांनी बाजी मारली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR