मुंबई : प्रतिनिधी
भारतीय जनता पक्षाने संभाव्य निवडणूक निकालाविषयी सर्व्हे करवून घेतला. त्यानुसार महायुतीला राज्यात १६५ जागा मिळतील असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला.
या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजप ९५ ते ११० जागा ज्ािंकेल. शिवसेनेला ४० ते ५० जागांवर विजय मिळेल. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला २५ ते ३० जागा मिळतील. या निवडणुकीत बहुमत आम्हाला मिळेल. महायुतीला १६५ पर्यंत जागा मिळतील, असा दावा विनोद तावडे यांनी केला.
हरियाणात काँग्रेसने एकाच समाजाचा विषय केला. त्यानंतर ओबीसी एकत्र आले आणि आम्ही हरियाणात १० वर्ष काम केले होते. विकास केला होता. समाज सोबत आला आणि आमचा विजय सोपा झाला. ज्या पद्धतीने महायुतीने पॉलिटिक्स ऑफ इनडायरेक्ट बेनिफिट आणि डायरेक्ट बेनिफिट केले. रस्ते, मेट्रो आणि पंतप्रधान ग्राम सडक योजना आणली. हा इनडायरेक्ट बेनिफिट. आणि शून्य विजेचं बिल, पिक विमा योजना आणि लाडकी बहीण योजना हा डायरेक्ट बेनिफिट मिळत आहे.