22.3 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुती व मित्र पक्षाकडून पैशाचे वाटप

महायुती व मित्र पक्षाकडून पैशाचे वाटप

नाशिक : देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? याबाबत वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. तसेच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू आहेत. नाशिक येथे पत्रकार परिषदेत रोहित पवार म्हणाले की, महायुती व मित्र पक्षाकडून पैशाचे वाटप सुरू आहे. बारामती, अहमदनगरनंतर नाशिकमध्ये महायुती पैशाचे वाटप करत आहे. महायुती राज्यात निवडणुकीत २ हजार कोटी रुपये खर्च करत आहे. एकट्या बारामतीत १५० कोटी खर्च करण्यात आले आहेत.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याच विचाराचा आता फुगा फुटला आहे. फोडाफोडीचे राजकारण व राजकारणाचा घसरत चाललेला स्तर हे भाजपच्या मतदारांना आवडलेले नाही. त्यामुळे भाजपचे मतदार बाहेर न निघाल्याने मताचा टक्का घसरला आहे, याचा फायदा महाविकास आघाडीला होणार आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर आम्हाला अँटी करप्शन मोहीम हाती द्यावी लागेल, असे रोहित पवारांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रात महायुतीला किती जागा मिळणार यावर रोहित पवार यांनी वक्तव्य केले आहे. भारतीय जनता पक्षाला १३ ते १४ जागा, शिवसेना शिंदे गटाला २ ते ३ जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, एकूण महायुतीला १६ ते १८ जागा मिळतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR