28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रातही भाजपच येणार

महाराष्ट्रातही भाजपच येणार

नागपूर : चार राज्यांतील निवडणुकांच्या निकालांनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. या विजयाचं श्रेय हे पंतप्रधान अमित शाह आणि जे.पी नड्डा यांचं आहे. मोदींवरील विश्वासाचं हे यश असल्याचं यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. हा अभूतपूर्व निकाल असून जनतेच्या मनात काय आहे याची ही नांदी असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. दरम्यान आता महाराष्ट्रात देखील भाजपचं सरकार येणार असल्याचा विश्वास देखील देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रीय अध्यक्ष आणि त्या त्या राज्यातली जी काही भाजपची टीम आहे आणि आमची राष्ट्रीय टीम आहे या सगळ्यांचं हे श्रेय आहे आणि म्हणून या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. भारतीय जनता पक्षाची मतं दहा टक्केपेक्षा देखील जास्त वाढलेली आहे आणि विशेषत: छत्तीसगड राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात ही टक्केवारी आहे. मध्य प्रदेशमध्ये आठ टक्क्यानी ती मतं वाढली असल्याची माहिती यावेळी देवेंद्र फडवीसांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR