26.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeक्रीडामहाराष्ट्रातील लोकप्रिय कबड्डी ऑलिंपिकमध्ये खेळली जाणार

महाराष्ट्रातील लोकप्रिय कबड्डी ऑलिंपिकमध्ये खेळली जाणार

वॉर्सा : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात लोकप्रिय असलेला कबड्डी खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळला जाण्याची शक्यता आहे. याबद्दल माजी खेळाडू आणि पोलंडच्या कबड्डी महासंघाचे अध्यक्ष मिचल स्पिक्झको यांनी सूचक विधान केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडच्या कबड्डी संघाचे अध्यक्ष मिचल स्पिक्झको यांची भेट घेतली. मोदींनी पोलंडमध्ये कबड्डी लोकप्रिय करण्यासाठी तसेच भारतीय आणि तेथील खेळाडूंमध्ये अधिक स्पर्धा आयोजित करण्याबाबत चर्चा केली.

नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीनंतर स्पिक्झको यांनी विविध बाबीवर प्रकाश टाकला. त्यांच्याकडून खूप सकारात्मक ऊर्जा मिळाली आणि अहमदाबादमध्ये स्टेडियम बांधल्याबद्दल त्यांचे कौतुक केले, जिथे मी २०१६ मध्ये विश्वचषकादरम्यान खेळलो होतो. २०३६ मधील ऑलिम्पिक भारतात होईल याला आमचे समर्थन आहे. कबड्डी लवकरच ऑलिम्पिकसारख्या मोठ्या व्यासपीठावर दिसेल, अशी आशा बाळगूया, असे स्पिक्झको यांनी सांगितले.

दरम्यान, भारत आणि पोलंड यांच्यात चांगले संबंध राहिले आहेत. पोलंडचे खेळाडू भारतात खेळल्या जाणा-या प्रो कबड्डी लीगमध्ये सहभागी होत असतात. स्पिक्झको स्वत: पीकेएलमध्ये खेळणारे पहिले पोलंडचे खेळाडू आहेत. २०१५ मध्ये त्यांना बेंगलुरु बुल्सच्या फ्रँचायझीने खरेदी केले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR