37.7 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय वळण

महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय वळण

होळकर खवळले  वाघ्या कुत्र्यावर रोखठोक भूमिका

मुंबई : ‘मागच्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात लोकांच्या प्रश्नापेक्षा ऐतिहासिक मुद्यांवर भर देण्याचे काम सुरू आहे. यामुळे समाज एकमेकाविरोधात उभा रहात आहे. मागे औरंगजेबाच्या समाधीचा विषय झाला.
होळकरांनी सर्व समाजासाठी काम केलं. सातारचे छत्रपती अजिंक्यतारावर बंधनात होते, तेव्हा होळकरांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. वाघ्या कुत्र्याच्या प्रकरणाला जातीय वळण न लावता मार्ग निघाला पाहिजे, असे भूषणसिंह राजे होळकर म्हणाले.

आता ताज्या परिस्थितीत रायगड येथील वाघ्या कुत्र्याचा विषय. रायगड येथे असलेल्या वाघ्या कुत्र्याच्या स्मारकाचा विषय हा कोणत्या एका जातीचा किंवा समाजाचा नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रात प्रत्येक विषयाला जातीय वळण दिले जाते. मी आमच्या घराण्याची भूमिका मांडण्यासाठी आलोय असे भूषणसिंह राजे होळकर म्हणाले. शिवाजी महाराजांनी कर्तृत्वाच्या जोरावर माणसं निवडली. वाघ्या कुत्र्याचं अस्तित्व होतं की नव्हतं, यावर मी काही बोलणार नाही, असे भूषणसिंह राजे होळकर म्हणाले.

लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत, म्हणून महाराष्ट्र शासन यांना मला विनंती करायची आहे, शासनाने पुढाकार घेऊन समिती नेमावी. दोन्ही बाजू ऐकून घ्याव्यात. दोन्ही बाजू इतिहास अभ्यासकांना समोरासमोर घेऊन ऐकल्या पाहिजेत. होळकरांनी रायगडावरील शिव स्मारकासाठी देणगी दिली. त्या स्मारकाबद्दल आमच्या भावना आहेत. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत या दृष्टीने विचार व्हावा, असे भूषणसिंह राजे होळकर म्हणाले. काल एका पत्रकार परिषदेत ऐकलं, होळकर इंग्रजांना घाबरत होते. मात्र इंग्रजांबरोबर कधी होळकरांनी सेटलमेंट केलेली नाही. असे वक्तव्य करणा-यांचा किती इतिहासाचा अभ्यास आहे हे पहावं लागेल. भारतात सगळ्यात शेवटपर्यंत इंग्रजांविरोधात कोणी लढा दिला असेल, तर ते महाराज यशवंतराव होळकर होते, असे भूषणसिंह राजे होळकर म्हणाले.

‘कोणाचा अजेंडा चालू देणार नाही’
तुकोजी राजे होळकरांनी अनेक विद्यापीठांना आणि शिवस्मारकांना निधी दिला. यामध्ये कोणाचा राजकीय हेतू असेल तर माझा इशारा आहे कोणाचा अजेंडा चालू देणार नाही. ३१ मे रोजी अहिल्याबाई होळकर यांची ३००वी जयंती आहे. यावेळी कोणतेही गालबोट लागू नये याची काळजी घ्यावी, असे भूषणसिंह राजे होळकर म्हणाले.

‘ब्रिगेडला इशारा’
होळकर शेवटपर्यंत इंग्रजांसोबत लढले. चुकीचे वक्तव्य खपवून घेतले जाणार नाही. ब्रिगेडला माझा इशारा आहे. तुकोजी महाराज होळकर यांचा रायगडावर फलक लावावा, अशी मागणी भूषणसिंह राजे होळकर यांनी केली. रायगडावर शिवस्मारकासाठी तुकोजी महाराजांनी निधी दिलाय, त्याच्या नोंदी आहेत. होळकरांनी स्वत:च्या कुत्र्याची समाधी रायगडावर का बांधली असती? या सगळ्या गोष्टी कथा आहेत ते इंग्रजांना घाबरत होते किंवा आणखी काही. वाघ्याची अडचण आहे की, तुकोजी महाराज होळकर यांनी निधी दिला याची अडचण आहे.. तुकोजी महाराज होळकर यांचा रायगडावर फलक लावावा, अशी मागणी भूषणसिंह राजे होळकर यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR