35.3 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeमुख्य बातम्यामहाराष्ट्रावर तिहेरी संकट; १० जिल्ह्यांत हाय अलर्ट

महाराष्ट्रावर तिहेरी संकट; १० जिल्ह्यांत हाय अलर्ट

मुंबई : वृत्तसंस्था
महाराष्ट्रात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे, विदर्भ प्रचंड तापला असून, तापमान ४१ अंश सेल्सिअसच्या पलीकडे गेलं आहे. मात्र दुसरीकडे हवामान विभागाकडून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रावर चक्राकार वा-यांची निर्मिती झाली आहे, त्यामुळे पुढील २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.

हवामान विभागानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना वादळी वा-यासह गारपीट आणि जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, पुणे, सातारा, अमरावती आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.

एकीकडे महाराष्ट्रात तर पावसाचा इशारा देण्यात आला आहे, पण दुसरीकडे कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. राज्यात उन्हाचा कडाका देखील वाढला आहे, सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रम्हपुरीमध्ये झाली आहे, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४१ अंश सेल्सिअसवर पोहोचलं आहे. गारपीट, पाऊस आणि वाढतं तापमान असं तिहेरी संकट सध्या राज्यावर आहे.

वीज कुठे कोसळणार हे समजणार!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने आकाशातील वीज कोसळण्याच्या घटनांचा अंदाज वर्तविण्यात महत्वाचे यश मिळविले आहे. आता इन्सॅट-३ डी उपग्रहाकडून मिळणा-या डाटा मार्फत सुमारे २.५ तास आधी वीज कोसळण्याचा अंदाज वर्तविणे शक्य झाले आहे. त्यामुळे शेतक-यांना शेतापासून दूरवर सुरक्षित जागेवर जाता येणार आहे. हवामानाचा अंदाज वर्तविण्याच्या विभागातील ही एक क्रांती मानली जात आहे. आऊटगोईंग लॉन्गवेव्ह रेडिएशनमध्ये इस्रोच्या राष्ट्रीय सुदूर संवेदन केंद्र ठफरउ च्या संशोधकांनी इनसॅट- ३ डी उपग्रहाद्वारे मिळालेल्या ‘आऊटगोईंग लॉन्गवेव्ह रेडिएशन’ ‘ओएलआर’ डाटामध्ये विशिष्ट संकेत पाहीले. त्यांना आढळले की ‘ओएलआर’च्या तीव्रतेत घट झाल्यामुळे वीज पडण्याची शक्यता असते. या निष्कर्षांवर आधारित, संशोधकांनी जमिनीच्या पृष्ठभागाचे तापमान आणि वा-याचा वेग यासारखे अतिरिक्त मापदंड समाविष्ट केले. आणि एक संयुक्त मानक विकसित केले आहे. ते विजेच्या हालचालींमधील बदल प्रभावीपणे टिपते आणि अंदाज वर्तविते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR