20.4 C
Latur
Friday, December 27, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र विधानसभा निकाल ते शपथविधीपर्यंतचा घटनाक्रम

महाराष्ट्र विधानसभा निकाल ते शपथविधीपर्यंतचा घटनाक्रम

लातूर : विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १२ दिवसांनी महायुती सरकारचा शपथविधी आज होत आहे. विधानसभा निवडणूक निकालात महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर तब्बल १० दिवस मुख्यमंत्री कोण होणार? हे स्पष्ट होत नव्हते. अखेर चार डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून शपथविधीच्या कार्यक्रमापर्यंत कोणत्या दिवशी काय, काय घडले त्याचा हा घटनाक्रम.

२३ नोव्हेंबर : निकालानंतर अमित शाह यांची एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याशी फोनवर चर्चा
२३ नोव्हेंबर : देवेंद्र फडणवीस यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी फोनवर चर्चा
२४ नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय
२४ नोव्हेंबर : शिवसेनेने एकनाथ शिंदे यांना विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले
२६ नोव्हेंबर : विधानसभेचा कालावधी संपल्यामुळे एकनाथ शिंदे यांचा राज्यपालांकडे राजीनामा, राज्यपालांनी त्यांनी हंगामी मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्याचे सांगितले.
२८ नोव्हेंबर : दिल्लीत एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्या घरी भेट घेत अर्धा तास चर्चा केली.
२८ नोव्हेंबर : अमित शाह यांच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक. फडणवीस आणि पवार मुंबईत परतले. शिंदे मुंबईत थांबले.
२९ नोव्हेंबर : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यपालांची भेट घेऊन ५ डिसेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी होणार असल्याचे सांगितले.
३० नोव्हेंबर : एकनाथ शिंदे साता-यातील दरेगावी रवाना, प्रकृती खराब असल्याचे कारण, दोन दिवस गावातच थांबले
२ डिसेंबर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी भाजपचे निरीक्षक नियुक्त
३ डिसेंबर : भाजपचे दोन्ही निरीक्षक मुंबईत दाखल. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत
४ डिसेंबर : देवेंद्र फडणवीस विधिमंडळ गटाचे नेते म्हणून निवड. दुपारी राज्यपालाकडे सरकार स्थापन करण्याचा दावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR