हिंगोली/आय. डी. पठाण
हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे व उध्दव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारासाठी औंढा नागनाथ येथे आपल्या भाषणात बोलताना उध्दव ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख सेनगावकर यांनी सांगितले की, कोणाला पानपट्टी टाकायची की, द्या १० हजार रुपये, हॉटेल टाकायची किंमत द्या १५ हजार रुपये व काल-परवाच मतदारसंघाचे आमदार यांनी वसमत येथे आम्हाला मुस्लिमांच्या मतांची गरज नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे आता मुस्लिम तुम्हाला मतदानच करणार नाहीत.
मागील वेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हिंगोलीला आले होते. त्यावेळेस त्यांनी हिंगोलीत मटका व वाळूची दुकाने मोठ्या प्रमाणात आहेत असे सांगितल्यावर सुध्दा त्याचा काहीही परिणाम झाला नाही. हिंगोलीचे भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी वरील व्यवसायांबाबत जिल्हाधिका-यांना निवेदन देऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यामुळे हिंगोली लोकसभा मतदारसंघात पुन्हा हिंदू-मुस्लिम हा वाद शिंदे गटाने निर्माण केला असून महाविकास आघाडीचा उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होईल.
हिंगोलीच नाही तर परभणी लोकसभेचे उमेदवार बंडू जाधव, वाशिम-यवतमाळ मतदारसंघातील संजय देशमुुख या तिन्ही लोकसभा मतदारसंघांत आघाडीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी होतील असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख सेनगावकर यांनी व्यक्त केला.