लातूर : प्रतिनिधी
संकल्प प्रतिष्ठान लातूर व विश्वकर्मा पांचाळ संघटना लातूरने या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे लातूर जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंब्याचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभऊ पटोले, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांना सुपूर्द केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ दि. ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी लातूर शहरातील गंजगोलाई येथील लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक परिसरात महाविकास आघाडीची प्रचार सभा झाली.
या प्रचार सभेत संकल्प प्रतिष्ठान लातूर व विश्वकर्मा पांचाळ संघटना लातूरने महाविकास आघाडीच्या लातूर जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना या विधानसभा निवडणुकीतील जाहीर पाठिंब्याचे पत्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले, लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्याकडे सुपूर्द केले. या संघटनेचे सर्व पदाधिकारी जाहीर पाठींबा देऊन महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रीय झाले आहेत.