23.3 C
Latur
Sunday, January 26, 2025
Homeमहावितरणकडून पहिल्यांदाच दर कपातीचा प्रस्ताव

महावितरणकडून पहिल्यांदाच दर कपातीचा प्रस्ताव

मुंबई : वृत्तसंस्था
कोळशावर तयार होणारी महागडी वीज खरेदी करण्याऐवजी भविष्यात १५ ते १६ हजार मेगावॉट वीज सौरऊर्जेच्या माध्यमातून तयार करण्यावर महावितरणकडून भर दिला जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना स्वस्त वीज देण्याचे नियोजन आहे. त्यादृष्टीने पुढील पाच वर्षांचे वीज दर ठरविण्यासाठीचा प्रस्ताव वीज नियामक आयोगाकडे सादर करण्यात आला आहे. प्रस्तावानुसार येत्या पाच वर्षांत घरगुती विजेचे दर २३ टक्क्यांनी कमी होणार आहेत.
महावितरणचा ८५ टक्के खर्च वीज खरेदीवर होतो. इतर घटकांवर १५ टक्के खर्च होतो. महावितरणला सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा सरासरी दोन हजार मेगावॅट वीज उपलब्ध असून, नियोजन केल्यानुसार भविष्यात यात वाढ होईल, साहजिकच विजेचे दर कमी करणे शक्य होईल, असा विश्वास महावितरणने व्यक्त केला आहे.
नव्या प्रस्तावानुसार १०० युनिटपर्यंत वीज वापरणा-या ग्राहकांना दिलासा मिळणार असून १७ फेब्रुवारीपर्यंत वीज दराच्या प्रस्तावावर सूचना, हरकती दाखल करता येतील. औद्योगिक ग्राहकांना मिळणा-या सवलती सुरूच राहतील. दिवसा जो वीज वापरेल त्याला जवळजवळ २ रुपये ४० रुपये सवलत मिळेल. विजेचे दर दरवर्षी ८ ते १० टक्के वाढणे अपेक्षित असते. मात्र, सौरऊर्जेमुळे पुढील पाच वर्षे विजेचे दर कमी होतील. त्यानुसार दर ९ रुपये ४५ पैशांहून ९ रुपये १४ पैसे असा कमी होईल. सौरऊर्जा प्रकल्पांमुळे पाच वर्षांत १०० युनिटपर्यंतच्या ग्राहकांसाठीचे दर ५ रुपये ८७ पैसे प्रतियुनिटपर्यंत, तर १०१ ते ३०० युनिट वापर असणा-या घरगुती ग्राहकांसाठीचे दर ११.८२ प्रति युनिटपर्यंत कमी होतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR