28.8 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeलातूरमहावितरणच्या दिव्यांग अभियंत्यास मारहाण, गुन्हा दाखल

महावितरणच्या दिव्यांग अभियंत्यास मारहाण, गुन्हा दाखल

लातूर : प्रतिनिधी
थकबाकी व वीजबील वसुलीसाठी गेलेल्या कासारसिरसी येथे कार्यरत असलेले प्रभारी उपकार्यकारी दिव्यांग अभियंता लदाफ शकिल अहमद रशीद यांना शिवीगाळ करत जबर मारहाण करण्यात आली. सोमवार दि. १ मार्च रोजी संध्याकाळी रामलिंग मुदगड येथे ही घटना घडली. मारहाण केल्याप्रकरणी कासारसिरसी पोलिस ठाण्यात संतोष सोमलिंग दुधनाळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वीजबील व थकबाकी वसुल करण्यासाठी तसेच प्रस्तावीत उपकेंद्राच्या जागेच्या तपासण्यासाठी अभियंता लदाफ शकिल अहमद रशीद हे आपल्या सहका-यांसह दि. १० मार्च रोजी रामलिंग मुदगड येथे गेले होते. जागेच्या तपासणीचे काम पुर्ण करुन बसस्थानक येथे ग्रामस्थांशी वीजबील भरण्याबाबत चर्चा करत असताना विकलेल्या जागेवरील थकीत वीजदेयक मला का मागतोस असा दम देत संतोष दुधनाळे याने दिव्यांग अभियंता लदाफ शकिल यांना शिवीगाळ करत धक्का देऊन खाली पाडून लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थांनी व कर्मचा-यांन मध्ये पडून अभियंता लदाफ यांची सुटका केली याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १३२, १२१(१) तसेच ३५१(२ व ३) तसेच दिव्यांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम २०१६ कलम ९२ अन्वये संतोष दुधनाळे याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR