22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरमहावितरणच्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

महावितरणच्या विरोधात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

चाकूर : प्रतिनिधी
विद्युत तारेचा धक्का लागून शेतकरी तथा ग्रामपंचायचे सदस्य शिवाजी हरिंश्चद्र शिंदे वय ४३ यांचा मृत्यू ंिद १२ नोव्हेंबर मंगळवार रोजी ३ वाजण्यांच्या सुमारास झाल्याची घटना तालुक्यातील महाळंग्रा या गावी घडली. या घटनेनंतर महावितरणच्या विरोधात संतप्त ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
शेतातील रब्बीच्या पिकाला पाणी देण्यासाठी स्प्रींक्लरचे पाईप टाकण्यासाठी गेलेल्या शेतक-यास लोंबकळलेल्या तारेचा स्पर्श होऊन विजेचा जोरदार धक्का लागुन शेतक-याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. महावितरणनास संबंधित शेतकरी आणि सरपंच मार्शल माने यांनी वेळोवेळी सांगूनही लोंबकळत असलेल्या तारेकडे दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे शेतक-याचा नाहक मृत्यू झाल्याची घटना घडल्याने महावितरणकडे संतप्त ग्रामस्थांनी कांही मागण्या करत ग्रामस्थांकडुन महाळंग्रा पाटी येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
मयताच्या वारसांना नोकरी व २० लाख रूपये नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी करीत त्याशिवाय मृतदेहावर अंन्तसंस्कार करणार नाही अशी भूमीका घेत राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको करण्यात आला. यावेळी महावितरण कंपनीने उपकार्यकारी अभियंता यांनी भेट दिली व आर्थीक मदत व इतर मागण्या मान्य करण्यांचे आश्वासन दिले. या नंतर मृतदेहावर महाळंग्रा येथील स्मशानभूमीत ंिद १३ नोव्हेबर बुधवारी रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे महाळंग्रा गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मयत शेतकरी शिवाजी हरिंश्चद्र शिंदे यांच्या पश्चात पत्नी सुनीता वय ४० आणि मुलगा संभाजी वय १९ हे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR