19.6 C
Latur
Tuesday, January 7, 2025
Homeमहाराष्ट्रमहावितरणला फडणवीसांचा विसर

महावितरणला फडणवीसांचा विसर

वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचा फोटो

जळगाव : प्रतिनिधी
अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. मात्र जळगावात महावितरणने पाठवलेल्या विजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील निमसरकारी प्रकल्प महावितरणकडून राज्यभरात वीज पुरवठा केला जातो. महावितरणकडून राज्यभरात वीज वितरण आणि वीज बिलांची देयके देण्याचे काम केले जाते. उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रिपद जाऊन तीन वर्षे होत आली आहेत. उद्धव ठाकरे यांच्यानंतर एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले.

महायुतीचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी सूत्रे घेतली. ५ डिसेंबर २०२४ पासून फडणवीस यांच्याकडे राज्याचे नेतृत्व आहे. परंतु महावितरणपर्यंत त्याची माहिती नाही. महावितरणच्या वीज बिलांवर उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री म्हणून फोटो आहे. त्यावरून भाजप आक्रमक झाली आहे.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार : आमदार रवींद्र चव्हाण
महावितरणच्या जळगाव येथील वीज बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो आहे. याबाबत बोलताना भाजप प्रदेश प्रभारी आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, जे घडले ते योग्य नाही. याबाबत आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणार आहोत. हे चुकून झाले असेल तर ठीक आहे. मात्र जर हेतुपुरस्सर घडत असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

जळगावातील प्रकार
अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाले. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. आता देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत. मात्र जळगावात महावितरणने पाठवलेल्या विजेच्या बिलांवर मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटो असल्याचे दिसून आले आहे. वीज बिलांवर ठाकरेंचा फोटो पाहून ग्राहकांना शॉक बसला आहे. यावरच आता आमदार आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी रवींद्र चव्हाण यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महावितरणच्या कारभाराची चर्चा ग्रामीण भागात नेहमी होत असते. तासन्तास वीज पुरवठा खंडीत असतो. कधी डीपीवरील फ्यूज उडाल्यावर कोणी तो बसवण्यासाठी वायरमन मिळत नाही. आता त्याच महावितरणकडून वीज बिलावर माजी मुख्यमंत्र्यांच्या फोटो वापरून धक्का दिला गेला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR