27.6 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeलातूरमहाविद्यालयीन युवकांनी खूप शिकण्याचे व मोठे होण्याचे स्वप्न पहावे

महाविद्यालयीन युवकांनी खूप शिकण्याचे व मोठे होण्याचे स्वप्न पहावे

लातूर : प्रतिनिधी
महाविद्यालयात शिकण्याचा काळ हा अत्यंत महत्त्वाचा व मोलाचा आहे म्हणून या सुवर्ण काळात वेळेचा अपव्यय होऊ न देता, सदुपयोग करावा. शिकण्याचे ध्येय व जिद्द असेल तर शिक्षणातून मिळणा-या ज्ञानामुळे जी कौशल्य प्राप्त होतात त्यामुळे आपल्या हातून इतरांची सेवा घडते. शिक्षण घेऊन मोठे होणे म्हणजे एखादे चांगले पद मिळवून समाजाची सेवा करणे होय. म्हणून युवकांनी खूप शिकावे व मोठे व्हावे असे विचार प्राचार्य डॉ. हरिदास फेरे यांनी प्रतिपादन केले. श्रीमती सुशीलादेवी देशमुख वरिष्ठ महाविद्यालयात आयोजित २०२४ वर्षे पाचवे संत गाडगेबाबा स्वच्छता उत्सव समारंभात प्राचार्य डॉ. हरिदास फेरे युवकांशी संवाद साधताना बोलत होते. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अजय पाटील हे होते. यावेळी विचार मंचावर समन्वयक प्रा. दादासाहेब लोंढे, स्टाफ सेक्रेटरी डॉ. कुमार बनसोडे, प्रा. शंकर चव्हाण, प्रा. सविता यादव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य डॉ.हरिदास फेरे म्हणाले की, शिक्षणातून ज्ञान मिळते व ज्ञान ही एक शक्ती आहे. हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप अभ्यास करून, ज्ञान मिळवून सर्वसामान्य माणसाला त्यांचे हक्क मिळवून दिले. ते श्रीमंत नव्हते. गरीबीतच शिकले, बॅरिस्टर झाले. आपल्या देशाचे संविधान निर्माण केले म्हणून संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व कार्याची माहिती कीर्तनातून सांगत होते. थोर मराठी संत व समाज सुधारकांनी केलेल्या सामाजिक क्रांती व चळवळीमुळेच आधुनिक महाराष्ट्र घडला तो कसा याविषयी सविस्तर माहिती प्राचार्य डॉ. हरिदास फेरे यांनी यावेळी सांगितली.
प्रारंभी प्रास्ताविक विचार प्रा. सविता यादव यांनी मांडले. शिक्षणाच्या माध्यमातूनच विद्यार्थी घडतो. विद्यार्थी जीवनात केलेले सर्वोत्तम विचार व संस्कारातून चांगला माणूस व आदर्श नागरिक घडण्यासाठी या समारंभाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन केले. या संदर्भातील आवश्यक ती माहिती प्रा. सविता यादव यांनी यावेळी सांगितली.
अध्यक्षीय समारोपाचे भाषण करताना प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी १९९१ ते २०२४ या काळात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून केलेले कार्य, वृक्षारोपण, पर्यावरण जागृती, स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन, सामाजिक प्रबोधन, रक्तदान, वाचन चळवळ संस्कृती, ग्रंथ प्रदर्शन, पोस्टर्स, भिंतीपत्रक या दृष्टीने प्रत्येक विभागाने त्या-त्या विषयाच्या युवकांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केलेले सामाजिक सर्वे अशा अनेक उपक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. ‘आम्ही सुशील’ हे ब्रीदवाक्य आमचे विद्यार्थी मनात व आपल्या विचारात सदैव जपतात. शिक्षक व विद्यार्थी याबरोबरच पालकांच्या सहकार्यामुळे महाविद्यालय आता नॅक मूल्यांकनाच्या तिस-या सर्कलला सामोरे जात आहे. ते कसे यासंदर्भात सविस्तर व यथोचित विचार मांडले. या समारंभाचे सुंदर असे सूत्रसंचालन सुरेखा बनकर यांनी केले तर आभार प्रा. शंकर चव्हाण यांनी मानले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR