31.1 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeलातूरमहाशिरात्रीनिमित्त ब्रह्मा कुमारीजतर्फे श्री रामेश्­वरम् झांकी

महाशिरात्रीनिमित्त ब्रह्मा कुमारीजतर्फे श्री रामेश्­वरम् झांकी

लातूर : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्­वरिय विश्­व विद्यालय, शाखा लातूरच्यावतीने महाशिरात्रीच्या निमित्ताने रामेश्­वरमची भव्य चाळीस फूट उंचीची झांकी उभी करण्यात येत आहे. झांकीचे दर्शन सर्वांसाठी ७ ते १७ मार्च असे दहा दिवस असणार आहे. ही झांकी ब्रह्माकुमारी चौक, जुना औसा रोड, राजयोग भवनच्यासमोर, लातूर येथे उभी केली जात आहे.  या झांकीचे इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये नाव नोंद होऊ शकते अशी आकर्षक झांकी असणार आहे. त्यामुळे, सर्वांनी आपल्या मित्र व सह परिवारासह दर्शन घ्यावे असे आवाहन राजयोगिनी ब्रह्माकुमारी नंदा यांनी पत्रकार परिषदेत केले.
ब्रह्मा कुमारीज ८८ वी त्रिमूर्ति शिव जयंती महोत्सव साजरा करत आहे. श्री रामेश्­वरम मंदिर दर्शना सोबत, परमात्मा शिव भगवानाची अतिशय प्राचीन राजयोग प्रदर्शनी ज्याद्वारे मेडिटेशन व मूल्य शिक्षण देण्यात येणार आहे.  असेही ब्रम्हाकुमारी नंदा यांनी यावेळी सांगितले. श्री रामेश्­वरम झांकीचे उद्घाटन ७ मार्चला सकाळी लातूर महानगर पालिकाचे आयुक्त्त बाबासाहेब मनोहरे, राजयोगी ब्रह्मा कुमार प्रेम भाईजी, ब्रह्मा कुमारीज राष्ट्रीय अध्यक्ष समाजसेवा प्रभागाचे डॉ. दीपक हारके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे त्यांनी याप्रसंगी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR