22.2 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeलातूरमहिलांच्या सन्मानार्थ संविधान रॅलीला मोठा प्रतिसाद 

महिलांच्या सन्मानार्थ संविधान रॅलीला मोठा प्रतिसाद 

लातूर : प्रतिनिधी
लोकशाही उत्सव समितीच्या वतीने दि. २६ ते ३० जानेवारीदरम्यान विविध उपक्रम शहरांमध्ये राबवण्यात आले. त्यानिमित्ताने ३० जानेवारी रोजी महात्मा गांधी स्मृतिदिनानिमित्त स्त्री सन्मानार्थ स्त्री-पुरुष समानता हा विषय घेऊन लातूर शहरातील विविध सामाजिक संघटनाच्या महिलांनी संविधान रॅली काढली. या रॅलीस महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या संविधान रॅलीत शहरातील नारी प्रबोधन मंच, सनराईज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सह्याद्री देवराई, राजर्षी शाहू महाविद्यालय, दयानंद विधी महाविद्यालय यांचा सहभाग होता. स्त्रियांच्या सन्मानार्थ स्त्री-पुरुष समानतेच्या घोषणा देत महिलांनी संविधान  रॅलीचे आयोजन केले होते. या रॅली दरम्यान महात्मा गांधी यांच्या पुतळयाला अभिवादन करून तसेच महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळांना अभिवादन केले. यावेळी संविधान उद्देशिकेचे वाचन महिला सदस्यांनी केले.
हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकशाही समिती लातूर, सुमती जगताप, नंदिनी पडिले, विधी महाविद्यालयाच्या  अ‍ॅड. लता महाजन, सुपर्ण जगताप, शिवाजीराव शिंदे, डॉ. गणेश गोमारे, अ‍ॅड. उदय गवारे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे माधव बावगे, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. शिंदे, उत्तरेश्वर  बिराजदार, लातूर शहर महानगरपालिका  पर्यावरण  प्रमुख संमती म्हेत्रे,  वृक्ष प्राधिकरण समाधान सुर्यवंशी, प्रा. दशरथ भिसे, डॉ. बी. आर. पाटील, प्राचार्य डॉ. कुसुम, मोरे, कुसुम जाधव, अनुराधा देऊळगावकर,  आकाश, सोनकांबळे, नयन राजमाने, श्याम जैन, राहुल लोंढे,  सुनील गायकवाड, भीम दुनगावे, आझम पठाण, संगीता शहरकर, मंदाकिनी शिंदे, पांडुरंग देडे, महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनी  सहभागी झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR