लातूर : प्रतिनिधी
महिलांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. घर, प्रपंच चालविण्यामध्ये महिलांचा सर्वाधिक वाटा असतो. महिला आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे. आर्थिक स्वावलंबनामुळे महिलांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होते. त्यामुळे महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहात आर्थिक स्वावलंबी होण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करु, अशी ग्वाही विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी दिली.
लातूर तालुक्यातील मसला व तांदूळजा येथे दि. २१ संप्टेंबर रोजी महिला बचत गटाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी बचत गटांच्या महिलांना संवाद साधताना श्रीमती वैशालीताई देशमुख बोलत होत्या. यावेळी रीड लातूरच्या अध्यक्षा सौ. दीपशिखा धीरज देशमुख, सुनिता अरळीकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, मांजरा साखर कारख्याचे माजी संचालक मदन भिसे, अश्वीन स्वामी, शिवाजी बावणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलतांना श्रीमती वैशालीताई विलासराव देशमूख म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाने महिलांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्षम करण्यासाठी असंख्य योजना, धोरणे राबविली आहेत. एकुण लोकसंख्येच्या ५० टक्के महिला असल्याने या महिलांना राजकीय क्षेत्रात संधी मिळावी म्हणून काँग्रेस पक्षाने सर्वप्रथम महिलांना राजकीय आरक्षण देण्याचे धोरण राबविले. त्यामुळेच आज महिला ग्रामपंचायतीच्या सरपंचपदापासून ते संसदेच्या सभापतीपर्यंत पोहोचल्या आहेत. महिलांनी विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केलेले आहे. आर्थिक क्षेत्रात महिलांनी स्वावलंबी होण्याची गरज असून त्यासाठी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना आवश्यक सहकार्य करु, असे आश्वासन त्यांनी दिले.
येत्या काही दिवसांत विधानसभा निवडुकीची रणधुमाळी सुरु होईल. त्यानिमित्ताने भाजपा महायुतीकडून पुन्हा दिशाभूल करणारी जाहिरात आणि खोटी आश्वासने दिली जातील. मतदारांनी खास करुन महिला भगिणींनी त्यांच्या भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन करुन श्रीमती वैशालीताई देशमुख पुढे म्हणाल्या, धिरज देशमुख यांनी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास केला. पाणी, वीज, रस्ते, आरोग्य सुविधा निर्माण केल्या आहेत. विविध योजनांतून विकास कामांसाठी मोठ्याप्रमाणात निधी खेचून आणला. विकासाची ही प्रक्रिया कायम राहण्याकरीता मतदारांनी आमदार धिरज देशमुख यांच्या पाठीशी आपला आशिर्वाद द्यावा, असेही त्या म्हणाल्या.
याप्रसंगी नरेंद्र आलटे, अक्षता शिंदे, अश्वीनी स्वामी, शरयु गायकवाड, नानासाहेब गायकवाड, वनिता बावणे, शोभा चव्हाण, रेखा कदम, दिपाली पावार, जयश्री देयमुख, सुनिता ओव्हाळ, अक्षता भगत, प्रियंका सांळुके, मंदाकिनी कदम, प्रियंका घोडके, प्राची शिंदे, जयश्री पोळ, श्रुती पालकर, अंजली नरवडे, जिवीका देवकते आदी महिला उपस्थित होत्या.