17.2 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeलातूरमहिला गृहउद्योजकांचे कार्य कौतुकास्पद

महिला गृहउद्योजकांचे कार्य कौतुकास्पद

लातूर : प्रतिनिधी
बचत गटाच्या माध्यमातून एकत्रित येत महिलांनी गृहउद्योगातून एक पाऊस पुढे टाकण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद असुन या कार्यायातून इतर महिलांना निश्चितपणे प्रोत्साहन मिळेल, असे प्रतिपादन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी केले.
शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्कवर गिण्याबाई देशमुख एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटी व एएलएफ बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला गृहउद्योगांचे प्रदर्शन व विक्रीस विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी भेट दिली. त्याप्रसंगी त्या महिला गृहउद्योजकांना शुभेच्छा देताना बोलत होत्या.
यावेळी डॉ. सारिका देशमुख, शुभदा रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी या प्रदर्शनातील  सुमारे ५० स्टॉल्सला सदिच्छा भेट देऊन महिलांनी उत्पादीत विविध गृहउपयोगी वस्तुंची पाहणी  केली.  या प्रसंगी माजी नगरसेविका रागिणी यादव यांनी प्रास्ताविक मांडत असताना महिला गृहउद्योगाच्या प्रदर्शन व विक्री उपक्रमा मागच्या हेतूची माहिती दिली.
यावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा बोराडेताई, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, माजी नगरसेविका जानव्ही सूर्यवंशी,  फॅशन डिझायनर रुपाली अजय बोराडे-पाटील यांची उपस्थिती होती. पाहूण्यांचे स्वागत जयश्री भूतेकर, शोभा कोंडेकर, काशीबाई  हांडे, दिशा देशमुख, अग्रवालताई, प्राची कुलकर्णी, अनुराधा औसेकर, वर्षा पत्की, प्रितम जाधव, अंजली पाटील, श्रद्धा भोसले, मीरा देशमुख, उळागड्डेताई, शीतलताई, संगीताताई मोरे, अमरजा भोसले, श्रीमती जयशेट्टी, उषा राठोड यांनी केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR