23.8 C
Latur
Saturday, May 24, 2025
Homeलातूरमांजरा, घरणी नदी दुथडी भरून वाहू लागली

मांजरा, घरणी नदी दुथडी भरून वाहू लागली

शिरुर अनंतपाळ : शकील देशमुख 
मान्सुन पूर्व अवकाळी पावसाची बॅटींग सुरूच असून सलग आठ दिवस झालेल्या वादळी पावसामुळे शिरूर अनंतपाळ तालुक्यातून वाहणा-या मांजरा व घरणी नदी उन्हाळ्यातच दुथडी भरून वाहत आहे . तसेच नाल्यांना पूर आल्याने शेतीत पाणी साचल्याचे पहायला मिळत आहे. मांजरा व घरणी नदी उन्हाळ्यात पहिल्यांदाच दुथडी भरून वाहत असल्याचे गावक-यांतून बोलले जात आहे.
     शिरूर अनंतपाळ तालुक्यात मागील आठ दिवसापासून विजेचा कडकडाट, वादळी वा-यासह अवकाळी पाऊस होत आहे. यात भाजीपाला, फळबाग, कांदा व उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले असले तरी तालुक्यात लागवड केलेल्या २ हजार ६०० हेक्टर ऊस पिकाला मात्र या पावसाने संजीवनी मिळाली असून या पावसाने शेतक-यांत कहीं खुशी कहीं गÞम अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
शिरूर अनंतपाळ तालुक्यात मागील आठ दिवसापासून वादळी वा-यासह पाऊस पडत आहे. या पावसामुळे शेतक-यांच्या फळबागांचे व उन्हाळी पिकांचे अतोनात नुकसान झाले तर दुसरीकडे या संततधार पावसामुळे वांजरखेडा, हालकी, डोंगरगाव, उजेड, बिबराळ, बाकली, राणी अंकुलगा शिवारातून वाहणा-या मांजरा नदी तसेच लक्कडजवळगा, जोगाळा, शिरूर अनंतपाळ, होनमाळ शिवारातून वाहणा-या घरणी नदी उन्हाळ्यातच पावसामुळे दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान मंगळवारी आलेल्या वादळी वा-यासह पावसाने गेली चार दिवसापासून पुरवठा खंडीत झाल्याने बिबराळ, बाकली व राणी अंकुलगा ही गावे वीज  अंधारातच आहेत. अशात पाऊस पडत असल्याने छोट्या-मोठ्या ओढ्यांना आणि नद्यांनाही पूर येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR