लातूर : प्रतिनिधी
राज्यात नावलौकिक असणा-या विलास नगर येथील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे कारखान्याचे चेअरमन तथा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या सूचनेनुसार मांजरा कारखाना व प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते सुरक्षा सप्ताह अंतर्गत वाहन चालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ऊस वाहतूक करणा-या ट्रॅक्टर चालकांना रिफ्लेक्टरचे महत्व सांगण्यात आले. सध्या ऊस गाळप हंगाम सुरू असून असंख्य वाहने उसाची वाहतूक करतात. त्यामुळे संबंधित वाहन चालकांनी रस्ते वाहतुकीसाठी असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून वाहनांना रिफ्लेक्टर बसवण्याचे महत्व विशद करण्यात आले. तसेच ऊस वाहतूक करणा-या वाहनांना रिफ्लेक्टर वाटप करण्यात आले. यावेळी प्रादेशिक परिवहन कार्यालय लातूर येथील मोटार वाहन निरीक्षक सागर भोसले व ओंकार कातोरे, कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी विनयकुमार टमके, चीफ अकाउंटंट शरद साळुंखे, सहाय्यक शेतकी अधिकारी ए पी पवार, ऊस वाहतूक करणारे ड्रायव्हर यांची उपस्थिती होती.

