35.2 C
Latur
Friday, April 4, 2025
Homeलातूरमांजरा साखर कारखान्याचे संचालक मंडळ बिनविरोध

मांजरा साखर कारखान्याचे संचालक मंडळ बिनविरोध

लातूर : प्रतिनिधी
राज्यातील सहकार क्षेत्रातील साखर कारखानदारीत नावलौकिक असलेल्या लातूर जिल्ह्यातील मांजरा साखर परिवारातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या  २०२५- २०३० या  पंचवार्षिक निवडणुकीत सर्व संचालक मंडळ बिनविरोध निवडून आले असून राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  या परिवारातील  दोनही सहकारी साखर कारखान्याची निवडणूक  पार पडली आहे. राज्यातील सहकार क्षेत्रात सलग  २५ वर्षात बिनविरोध निवडून येणारे मांजरा साखर परिवारातील साखर कारखाने पहिले ठरलेले असून राज्याच्या सहकार क्षेत्रात या बिनविरोध निवडीमुळे मांजरा साखर परिवाराचा नवा पॅटर्न निर्माण झाला आहे
बिनविरोध निवड; सभासदांचा परिवारावर विश्वास
राज्याचे माजी मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांनी ज्या पद्धतीने मांजरा साखर उद्योग उभे केले तो शेतकरी केंद्रबिंदू मानून कार्य केले अजूनही त्याच पद्धतीने राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सहकारी साखर कारखानदारी अतिशय सूक्ष्म नियोजन पारदर्शकता ठेवून कार्य करीत या भागातील आर्थिक सुबत्ता देण्याचे काम या मांजरा साखर परिवारातील साखर कारखान्यानी केलेले आहे. हे सगळ आपण उघड डोळ्याने पाहतोय. त्यामुळे या कारखानदारीत राजकीय हस्तक्षेप केलं नाही.
समाजाचे भले कस होईल व शेतक-यांना जास्तीत जास्त मदत कसे करता येईल याचाच विचार संचालक मंडळ करीत असताना कारखाने चांगले व नफ्यात चालले पाहिजे याकडेही  परिवाराचे लक्ष असते. त्यामुळें गेल्या २५ वर्षात पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. सहकार क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणारे राज्यात नावलौकिक म्हणुन मांजरा परिवाराची ओळख राहिलेली आहे. त्यामुळे  राजकीय विरोधक सुद्धा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली होणा-या साखर कारखान्याच्या निवडणुकीत फॉर्म भरत नाहीत,  हे विशेष आहे.
कारण हे साखर उद्योग नुसते कारखाने नाहीत तर शेतक-यांचे मंदिर झालेले आहेत. हे सर्व ग्रामीण भागातील उस उत्पादक शेतक-यांना मतदारांना चांगल माहीत आहेत. त्यामुळें परिवारातील मांजरा, रेणा, विलास साखर कारखान्याचे पंचवार्षिक निवडणुकीत लोकनेते विलासराव देशमुख सहकार विकास पॅनलचे सर्व उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.  विरोधकांचा तीन्ही साखर कारखान्यात एकही नामनिर्देशन फॉर्म राहिला नाही हे मांजरा साखर परिवारावर असलेल्या लोकांकडून विश्वासाची कार्याची पावती आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR