लातूर : प्रतिनिधी
सार्वजनिक जीवनात काम करीत कर्तव्य पार पाडत असताना लोकांचे सहकार्य, मांजरेश्वर हनुमान व लोकनेते विलासराव देशमुख यांचा आशीर्वाद त्यामुळे देशमुख परिवाराला मागच्या ५० वर्षापासून समाजकारण व राजकारण करण्याची संधी मिळाली त्यातून चांगल काम करता आले. हणमंतानी दिलेली गदा यापुढेही आपल्या चांगल्या कामासाठी सदैव मी लातूरकरांच्या कायम सेवेत राहणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी शनिवारी मांजरेश्वर हनुमान मंदीरात भक्त संजय माने यांनी मांजरेश्वर हनुमान मंदिराला सव्वा किलो चांदीची गदा अर्पण केली. त्यानंतर माने मित्र परिवाराच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते कार्यक्रमात बोलत होते. तत्पूर्वी माजी मंत्री दिलीपराव देशमुख व सौ सुवर्णाताई देशमुख यांच्या हस्ते मांजरेश्वर हनुमानाची महापूजा करण्यात आली.
यावेळी पंडित आत्माराम शास्त्री आळंदीकर महाराज, माजी आमदार अॅड. त्रिंबक भिसे, यशवंतराव पाटील, सर्जेराव मोरे, विजय देशमुख, अॅड. प्रमोद जाधव, रवींद्र काळे, शाम भोसले, बळवंत काळे, अनंतराव देशमुख, संतोष देशमुख, सचिन पाटील, गणपतराव बाजुळगे, विकास देशमुख, हरिराम कुलकर्णी, सचिन दाताळ, गुरुनाथ गवळी, चव्हान, टेंकाले, बबन देशमुख, सुडे, बाळासाहेब कदम आदी मान्यवर उपस्थित होते
माझ्या ५० वर्षाच्या राजकीय सामाजिक कार्यात लातूरकरांनी निस्वार्थ भावनेने प्रेम केले. मांजरेश्वर हनुमान मंदिरात आल्यावर ऊर्जा व शक्ती मिळत. जे जे मला चांगले करता आले ते करण्याचा मी प्रयत्न केला. पुढील काळात लोकांच्या चांगल्या कामासाठी मी सदैव आपल्या सेवेत राहणार असून माझा लढा चुकीच्या विरोधात राहणार आहे, असे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी यावेळी स्पष्ट केले.
यावेळी विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे नूतन संचालक तात्यासाहेब देशमुख, कैलास पाटील, सचिन शिंदे, नीलकंठ बचाटे, धनराज दाताळ, दयानंद बिडवे, मदन भिसे, वसंत उफाडे, शंकर बोलंगे यांच्यासह जागृती शुगरचे जनरल मॅनेजर गणेश येवले, मुख्य शेतकी अधिकारी रामानंद कदम, मांजरा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालगक पंडित देसाई, रेणा साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे यांच्यासह मांजरा साखर परिवारातील संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते