24.5 C
Latur
Sunday, July 6, 2025
Homeलातूरमाऊली शैक्षणिक संकुलात आषाढी दिंडी उत्साहात 

माऊली शैक्षणिक संकुलात आषाढी दिंडी उत्साहात 

लातूर : प्रतिनिधी
येथील  अंबेजोगाई रोडवरील उपक्रमशील शैक्षणिक केंद्र म्हणून परिचित असलेल्या माऊली विद्यार्थी विकास केंद्र, माऊली बालक मंदिर , (सेमी इंग्लिश) माऊली इंटरनॅशनल मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दि.४ जुलै रोजी आषाढी दिंडी काढण्यात आली.
पंढरपूरचा विठोबा म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत होय. त्या परंपरेची संस्काराची जाणीव व महत्व बालवयापासूनच होण्यासाठी दरवर्षी विद्यालयात आषाढी दिंडीचे आयोजन करण्यात येते. या दिंडीत वारक-यांच्या वेशभूषेत चिमुकले विद्यार्थी पालकांसमवेत सहभागी झाले होते. या नयनरम्य सोहळयामध्ये बसपुरे स्वामी, साईदर्शन व आरडले आरूषी यांनी विठ्ठल रुक्मिणीची तर मदने क्रिश व कराड तेजस यांनी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वराच्या वेशभूषा साकारल्या होत्या.
यावेळी  महिला भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीची भक्ती भावाने पूजा करून पालखीचे दर्शन घेतले. संगीत शिक्षक वाघ यांनी ‘कानडा राजा पंढरीचा’ या भक्तिमय गीताने सर्वांना मंत्रमुग्ध केले.  दिंडीची सांगता वारकरी भजनी मंडळाच्या हस्ते विठ्ठलाच्या आरतीने करण्यात आली व त्यानंतर सर्व उपस्थितांना प्रसाद वाटपही करण्यात आले. या दिंडीमध्ये संस्था सचिव गंगाधर आरडले, कोषाध्यक्ष तानाजी बेवनाळे पाटील, व्यंकटराव आरडले (पिताजी), प्राचार्या कविता आरडले, उपप्राचार्या काळे भाग्यश्री, संपूर्ण शिक्षक वृंद,  कर्मचारी, पालक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी व्यवस्थापक गोपाळ करडिले व सर्व कर्मचा-यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR