24.1 C
Latur
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रमागून येणा-यांना आधी संधी मिळते

मागून येणा-यांना आधी संधी मिळते

मुंबई : भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजप आमदार माधुरी मिसाळ यांच्या चर्चेचा व्हीडीओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

एकनाथ खडसे आणि माधुरी मिसळ यांची भेट झाली. यावेळी दोघांमधील चर्चा रेकॉर्ड झाली आहे. यात एकनाथ खडसे हे माधुरी मिसाळ यांच्याशी बोलताना, मागून येणा-यांना संधी मिळते. नव्यांना संधी मिळते. आपल्याला सांगतात थांबा थांबा. हे वाईट आहे, असे बोलताना दिसून आले. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे. या संभाषणावेळी आमदार अतुल भातखळकर देखील उपस्थित होते. आता एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य नक्की कोणाला उद्देशून केले, याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये स्वगृही परतण्यास इच्छुक आहेत. अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ खडसे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याआधीच त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांच्यासाठी प्रचार केला होता. रक्षा खडसे या रावेर लोकसभा मतदारसंघातून सलग तिस-यांदा निवडून आल्या आणि त्यांची केंद्रीय राज्यमंत्रिपदी वर्णीही लागली. लोकसभा निवडणुकीनंतर एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश होईल, असे बोलले जात होते. मात्र अद्याप एकनाथ खडसे यांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. त्यातच आता एकनाथ खडसे यांचा माधुरी मिसाळ यांच्यासोबत चर्चा करतानाचा व्हीडीओ समोर आला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR