लातूर : प्रतिनिधी
राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची लातूर ग्रामीणचे माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांनी २१ मे २०२५ रोजी त्यांच्या निवासस्थानी भेट घेवून मांजरा नदीवरील लातूर तालुक्यातील बोरगाव अंजनपूर निम्न पातळी बंधा-याचे स्वयंचलित दरवाजे क्षतिग्रस्त झाले असल्याने गोदावरी मुळी बंधा-याच्या धरतीवर उभ्या उचल पध्दतीचे नवे दरवाजे बसवण्या संदर्भात निवेदन देवून यास निधी देण्यात यावा अशी मागणी केली होती.
या मागणीची दखल घेवून सदरील कामासाठी १३ कोटी ९० लाख १५ हजार ७८० रूपये एवढया रकमेच्या अंदाजपत्रकास दि. ४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. शेतक-यांची अडचण लक्षात घेवून माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पुढाकार घेवून बोरगाव अंजनपूर निम्न पातळी बंधा-यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेतल्या बद्दल शेतक-यांकडून त्यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.