चाकूर : प्रतिनिधी
चाकूरचे सुपुत्र तथा वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.शिवराज नाकाडे यांचे ंिद १ ंिडसेबर रोजी सकाळी निधन झाले. त्यांच्यावर दुपारी ४ वाजता गंगापूर-पाखरसांगवी येथील शेतीत अन्त्यसंस्कार करण्यांत आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे, असा परिवार आहे.
त्यांचे शिक्षण क्षेत्रातील कार्य अविस्मणीय आहे. दयानंद विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, विनाअनुदानित विधी महाविद्यालयांना सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन अनुदान मिळविणारे लढवय्ये, डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उर्दू विभाग सुरू करणारे कुलगुरू, विद्यार्थी वर्गाचे कल्याण करणारे, कमवा- शिका योजना विस्तारित करून खुला वर्ग व मागासवर्गीयांना समान दिवस काम देण्याचा व योजनेत मुलींनाही प्रवेश देण्याचा निर्णय करणारे समतावादी कुलगुरू, विभाजित युवक महोत्सवाऐवजी एकत्रित युवक महोत्सव घेणारे कुलगुरू, शिक्षकांची रिक्त पदे भरून विभागांना सर्वसमावेशक व सर्वस्तरातील शिक्षक देणारे व दलित वंचित वर्गाचे प्रोफेसर व रीडर आरक्षण स्पेशल ड्राईव्ह घेऊन भरणारे कुलगुरू म्हणून त्यांचा उल्लेख करावा लागेल. हैद्राबाद येथील उस्मानिया विद्यापीठाचे गुणवंत विद्यार्थी,चारित्रर््यसंपन्न असे मराठवाड्यातील शैक्षणिक नेतृत्व पडद्याआड गेले आहे.