22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमाजी खासदारांचा भाजपला रामराम

माजी खासदारांचा भाजपला रामराम

पटले यांनी केले भाजपवर आरोप
भंडारा : प्रतिनिधी
अनेक दिवसांपासून भाजपमध्ये कार्यरत असलेले माजी खासदार शिशुपाल पटले यांनी अखेर भाजपला रामराम केला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पाठवला आहे. राज्य सरकार शेतकरी, बेरोजगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत आहे. आपण अनेकदा या समस्यांबाबत संबंधित मंत्र्यांना भेटलो. परंतु कामे होत नसल्याने त्यांनी भाजपचा राजीनामा देणार असल्याचा इशारा दिला होता. अखेर त्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. आता ते कॉंग्रेस पक्षात जाण्याची शक्यता आहे.

शिशुपाल पटले यांनी भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. तसेच त्यांनी २००४ मध्ये लोकसभा निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांचा पराभव केला होता. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पटले यांनी दिलेला राजीनामा भंडारा जिल्ह्यातील भाजपसाठी धक्का मानला जात आहे. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार यांच्या ज्वलंत प्रश्नांवर सरकारकडे पाठपुरावा करीत होतो. मात्र राज्यातील सरकारने व सत्तेत सहभागी असलेल्या पक्षनेतृत्वाने कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळेच भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असल्याचे पटले यांनी स्पष्ट केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR